पुणे । विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट, हिंद शक्ती सोशल फाऊंडेशनच्या वतीने आणि पुणे जिल्हा बुद्धीबळ संघटना मान्यताप्राप्त ११ व्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळ येथे रविवार, दिनांक २६ जानेवारी रोजी होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुनील पांडे यांनी दिली.
स्पर्धेला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी ९८९०६१७४६१, ९८९०४८५६६६, ९८२२४४६७८३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
सुनील पांडे म्हणाले, स्पर्धेचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. यावेळी नगरसेवक आनंद रिठे, एमएनजीएलचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे, सुहाना मसालेचे संचालक विशाल चोरडीया, राष्ट्रीय टेबल टेनिसपटू पृथा वर्टीकर, पश्चिम महाराष्ट्र भाजपचे संघटन मंत्री रवी अनासपुरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा स्वीस पद्धतीने होणार आहे. स्पधेर्चे पारितोषिक वितरण सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
प्रत्येक गटातील १ ते १० क्रमांकाना पारितोषिक देण्यात येणार असून ८ वषार्खालील, १२ वषार्खालील, १६ वषार्खालील गटात ही पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच महिला व ज्येष्ठ नागरीक यांंना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ३० हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून भांडारकर रोड येथील साने डेअरीजवळील नागेश्वर लॉन्ड्री येथे प्रवेशअर्ज उपलब्ध आहेत.