---Advertisement---

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या अधिकृत पोस्टरचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अनावरण

On: शुक्रवार, जानेवारी 24, 2020 4:48 PM
---Advertisement---

पुणे। तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या अधिकृत पोस्टरचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर उपस्थित होते.

“इंडियाज महा ओपन” म्हणून नावाजलेल्या दक्षिण आशियातील एकमेव एटीपी टूर स्पर्धा टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या पोस्टरचे अनारवरण करून आपल्या जाहिरात मोहिमेची सुरूवात करण्यात आली. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथे 3 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.

स्पर्धेत बेनॉय पेर, इव्हो कार्लोवीच या जगातील दिग्गज खेळाडूंसह भारताचा खेळाडू दिवीज शरण यांचा खेळ पाहण्याची संधी टेनिस प्रेमींना मिळणार आहे.

भारताच्या टेनिस कॅलेंडरमधील हि एक महत्वाची स्पर्धा पुण्यात होणे हा पुण्याचा बहुमान आहे, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने 1 व 2 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. गेल्या वर्षी या स्पर्धेला पुण्यातील क्रीडा प्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला होता. यावर्षीही असा प्रतिसाद मिळेल असे आम्हाला वाटते.

https://twitter.com/Maha_Sports/status/1220622745769103360

https://twitter.com/Maha_Sports/status/1220658083988299781

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---