---Advertisement---

IPL 2024 । पंजाब किंग्जला ट्रॉफी जिंकवून देण्याची जबाबदारी संजय बांगरांच्या खांद्यावर! दिग्गज नव्या भूमिकेत

Sanjay Bangar with Punjab Kings
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी सर्व फ्रँचायझी तयारीला लागल्या आहेत. येत्या 19 डिसेंबर रोजी आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. त्याआधी अद्याप एकही आयपीएल ट्रॉफी जिंकू न शकलेल्या पंजाब किंग्जने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी हंगामात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंजाब किंग्जने दिग्गज संजय बांगर यांना आपल्यासोबत जोडले आहे.

आयपीएल 2024 (IPL 2024) हंगाम सुरू होण्याआदी भारतीय संघाचे माजी दिग्गज संजय बांगर (Sanjay Bangar) पंजाब किंग्जसोबत जोडले गेले आहेत. पंजाब किंग्ज फ्रँचायझीकडून याविषयीची अधिकृत माहिती मिळाली. पंजाबच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केली गेली की, “आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, संजय बांगर यांचे पुनरागमन झाले आहे. पंजाब किंग्जच्या हेड ऑफ क्रिकेट डेवलपमेंट पदी त्यांची नियुक्ती केली गेली आहे. बांगल आपल्यासोबत संघात मोठा अनुभव घेऊन आले आहेत. आम्हाला विश्वास आहे की, त्यांच्या मार्गदर्शनात संघ नव्या उंचीवर पोहोचेल.”

दरम्यान, संजय बांगर यांनी याआधीही पंजाब किंग्जसोबत काम केले आहे. आयपीएल 2014 मध्ये त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी सहायक प्रशिक्षक म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यानंतर संघाचे नाव बदलून पंजाब किंग्ज असे केले गेले. आयपीएलमध्ये इतर संघांसाठीही बांगर यांनी काम कले आहे. मुख्य प्रशिक्षकाची भूमिकाही त्यांनी पार पाडली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि कोची टस्कर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएल संघांसोबत कामाचा अनुभव बांगर यांच्याकडे आहे. त्याव्यतिरिक्त ते इंडिया ए आणि वरिष्ठ भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचाही भाग राहिले आहेत. (Punjab Kings have entrusted Sanjay Bangar with special responsibility for IPL 2024)

महत्वाच्या बातम्या – 
सदर्न स्टार विजय रन 2023चे 16 डिसेंबर रोजी पुण्यात आयोजन
‘त्याने 20 किलो वजन कमी केले, तर मी त्याला…’, असगरने सांगितला धोनीसोबतचा Asia Cup 2018मधील मजेशीर किस्सा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---