बीग बॅश लीगमध्ये शनिवारी (31 डिसेंबर) मेलबर्न स्टार्स आणि एडिलेड स्ट्राइकर्स यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस याने या सामन्यात अवघ्या 35 चेंडूत 74 धावा कुटल्या आणि मेलबर्न स्टार्सला विजय मिळवून दिला. एडिलेड संघ 8 धावांनी पराभूत झाला. स्टॉयनिस मेलबर्न संघासाठी मॅच विनर ठरला असला, तरी पंचांनी त्याला खेळण्याची परवानगी दिल्यामुळे एडिलेड संघाचे खेळाडू नाराज दिसले. पण आता स्टॉयनिसने या सर्व खेळाडूंना प्रत्योत्तर दिले आहे.
बीबीएलच्या नियमांनुसार एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर पुढच्या फलंदाजाला खेळपट्टीवर येण्यासाठी 75 सेकंदांचा वेळ असतो. जर या निर्धारित वेळच्या आतमध्ये नवीन फलंदाज स्ट्राईकवर आला नाही, तर त्याला नियमाने पंचांनी बाद दिले पाहिजे. पण एडिलेड स्ट्राइकर्सचा खेळाडू एडम होस (Adam Hoss) याच्या मते पंचांनी हा नियम मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) याच्या वेळी उपयोगात आणला नाही. पंचांच्या या हलगर्जीपणामुळे होसने नाराजी व्यक्त केली असून स्टॉयनिसने देखील स्वतःची बाजू मांडली आहे.
याविषयी बोलताना होस म्हणाला की, “तो एक गुणवंत फलंदाज आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर त्याच्या पहिल्या चेंडूवेळी मी कवरवर उभा होतो. मला पूर्ण विश्वास होता की टाईम आउट झाला आहे. त्याच्याकडे 75 सेकंद होते, ज्यामध्ये तो फलंदाजीसाठी तयार नव्हता. यामुळेच पंचांसोबत आमचा थोडा वाद झाला. आम्ही सर्वजन अपील करत होतो. मला पूर्ण खात्री नाहीये की, त्याठिकाणी नेमकं काय झाला. पण स्टॉयनिसची वेळ संपलेली याविषयी मला खात्री आहे.” होसच्या या प्रतिक्रियेनंतर स्टॉयनिसनेही उत्तर दिले.
स्टॉयनिसच्या मते तो खेळपट्टीवर पोहोचला होता, पण विरोधी संघाचे खेळाडू त्यांच्या जागेवर उभे नसल्यामुळे तोदेखील बाजूला उभा होता. “मी मध्य (स्टंप) तपासून पाहिला. मी त्याठिकाणी पोहोचलो होतो आणि खेळपट्टीवर उभा आहे. मी खेळाडूंना त्यांची जागा बदलताना पाहिले होते, पण मला हे माहिती नव्हते की, मला इतर गोष्टींकडे लक्ष न देता त्याच ठिकाणी उभा राहायचं आहे. आम्ही फलंदाजीला तयार असताना खेळाडू पुढे येत होतो. मला वाटले क्षेत्ररक्षण करणारे त्यांची जागा बदलत आहेत. अशात जोपर्यंत हे सर्वजण जागेवर पोहोचत नाहीत, तोपर्यंत मी त्याठिकाणी जाऊन उभा राहणारच नव्हतो.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर मेलबर्नने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात एडिलेड स्ट्राइकर्स संघाने 5 बाद 178 धावांपर्यंत मजल मारली. परिणामी एडिलेड संघ विजयापासून 8 धावा लांब राहिला. मेलबर्न संघाला त्यांचा पुढचा सामना मंगळवारी (3 जोनेवारी) खेळायचा आहे. (Questions raised on umpires in BBL, how did Marcus Stoinis bat despite being out? )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकदिवसीय आणि कसोटीत भारताचा कर्णधार ठरला, बीसीसीआयच्या बैठकीत शिक्कामोर्तब
मुंबईचा ‘धनुर्धर’ झाला एकदम फिट, बुमराहच्या साथीने संघाला मिळवून देणार सहावी आयपीएल ट्रॉफी