दक्षिण आफ्रिकेचे सध्या तिन्ही क्रिकेट प्रकारात कर्णधारपद भूषविणारा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक याला कसोटी कर्णधार पदावरून काढून टाकले जाईल असे प्रशिक्षक मार्च बाऊचर यांनी सांगितले आहे. त्याच्या वरील दबाव कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून त्यानंतर तो आपले सर्वोत्तम योग्यदान देईल असे त्यांचे म्हणणे आहे .
डिकॉकला २०२०-२१ हंगामासाठी तात्पुरते कर्णधारपद सोपविण्यात आले होते. कसोटीत संघाची कमान त्याने आपल्या हातात घेतल्यापासून त्याने चांगली कामगिरी केलेली नाही. कराची येथे पाकिस्तान विरोधात खेळाल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने फक्त १५ आणि २ इतक्याच धावा केल्या, पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव झाल्यामुळे संघ व्यवस्थापनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
प्रशिक्षकांच्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हा आम्ही या पाकिस्तान दौऱ्यावरून परत येऊ त्यावेळी पुढील मालिकेसाठी विचार करायला आमच्याकडे थोडा वेळ असेल, तेव्हा आम्ही योग्य तो निर्णय घेऊ’. क्विंटन डिकॉकच्या जागेवर कोण असू शकत यावर नीट विचार केला जाईल. जेणेकरून त्याच्यावरील दबाव कमी होईल आणि तो आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकेल. आपण धावा न केल्यास ते प्रत्येक जणाला दिसून येते. विशेषतः तेव्हा जेव्हा आपण संघाचे नेतृत्व करीत असतो. अशा वातावरणात आम्हाला त्याच्या विरोधात कठोर व्हायचे नाही. तो एक चांगला खेळाडू असून तो फॉर्ममध्ये लवकरच परतेल.’
त्याच्याकडे अतिरिक्त कारभार सोपविण्यात आल्यामुळे कधी कधी अशा गोष्टीची सवय नसल्याने ते कठीण होऊन बसते, असे देखील बाऊचर यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील विजयात बाबर आजम, अझर अली आणि फवाद अली यांनी महत्वाची भूमिका बाजावली. त्यानंतर गुरुवारपासून(४ फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना हा रावळपिंडी येथे खेळला जात आहे.
क्विंटन डिकॉकची क्रिकेटमधील कारकीर्द
आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत डिकॉकने आतापर्यंत ५० कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ४७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ५० कसोटी सामन्यात ३७.७१ च्या सरासरीने त्याने २९७९ धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यात ४४.६६ च्या सरासरीने ५१३५ इतक्या धाव केल्या आहे. ४७ टी-२० सामन्यात त्याने ३१.०१ च्या सरासरीने १३०३ धावा काढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पर्थ स्कॉर्चर्सची बीबीएलच्या अंतिम सामन्यात धडक, आता सिडनी सिक्सर्स विरुद्ध होणार विजेतेपदासाठी लढत
‘स्पायडरमॅन’ गेला बुमराहच्या डोक्यात! पंतने सोडलेला ‘तो’ कॅच बुमराह आयुष्यभर विसरणार नाही; कारण…