सेन्चुरियन। भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने आज मजा म्हणून वेगवान गोलंदाजी केली आहे. त्याच्या या वेगवान गोलंदाजीचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटरवरून शेयर केला आहे.
बीसीसीआयने ट्विट मध्ये लिहिले आहे की ” एक मजा म्हणून अश्विनने फिरकी ऐवजी वेगवान गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.”
https://twitter.com/BCCI/status/951422183720603649
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेला ५ जानेवारी पासून सुरुवात झाली होती. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघावर ७२ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली होती. परंतु फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीचा फटका भारतीय संघाला बसला होता.
दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना चांगल्या साथ देतात. त्यामुळे या सामन्यात फिरकी गालंदाज म्हणून फक्त अश्विनला खेळवण्यात आले होते. पण बीसीसीआयने आज शेयर केलेल्या व्हिडीओ बघून अश्विनही वेगवान गोलंदाजी करणार का असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.