अतिशय रंगतदार स्थितीत असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामन्याचा आज (१६ फेब्रुवारी) चौथा दिवस आहे. या दिवशी तब्बल ४२९ धावांचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि डॅनियल लॉरेन्स फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. परंतु दिवसाच्या सुरुवातीलाच भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने मिळून लॉरेन्सची शिकार केली. त्यामुळे इंग्लंडच्या चिंतेत भर पडली आहे.
त्याचे झाले असे की, ३ बाद ५३ या धावसंख्येपासून पुढे इंग्लंडच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने युवा गोलंदाजांच्या हाती सुरुवातीची काही सोपवली. त्यानंतर डावातील २६ वे षटक टाकण्यासाठी फिरकी गोलंदाज अश्विन आला. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी लॉरेन्स असल्याचे पाहून अश्विनने अतिशय चपळाईने क्रिजेच्या बाहेरच्या बाजूला चेंडू टाकला.
आपल्या अपेक्षेपलीकडे वेगळ्याच बाजूने चेंडू येत असल्याचे पाहून लॉरेन्स गोंधळून गेला आणि चेंडू त्याच्या पायातून सरळ मागे यष्टीरक्षक पंतच्या दिशेने गेला. पंतनेही पटकन डाव्या बाजूला वळून चेंडू पकडला आणि यष्टीला लावला. अशाप्रकारे दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनला मोठी विकेट मिळाली.
We’ve got Pant, Rishabh Pant! #RishabhPant #INDvsENG #ENGvIND @RishabhPant17 #BCCI pic.twitter.com/QQPshCb2Ty
— Rishikesh Deshmukh (@RishikeshTweets) February 16, 2021
https://twitter.com/away_idle/status/1361531971059421184?s=20
https://twitter.com/cricket_cri/status/1361533554493112320?s=20
⚡️⚡️#INDvENG @Paytm pic.twitter.com/liwl5KNeMc
— BCCI (@BCCI) February 16, 2021
दुसरीकडे लॉरेन्स ५३ चेंडूत अवघ्या २६ धावांवर पव्हेलियनला परतला. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि २ चौकार मारले होते. लॉरेन्सनंतर धाकड फलंदाज बेन स्टोक्स फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. कर्णधार रुट आणि स्टोक्सकडून इंग्लंड संघाला मोठ्या भागिदारीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG 2nd Test Live : चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवसाला सुरुवात, पाहुण्यांपुढे ४२९ धावांचे आव्हान
‘माझा नवराच सर्वांना ट्रोल करत आहे,’ अश्विनच्या लक्षणीय खेळीनंतर बायकोचं धमाकेदार ट्विट
नागालँडचा एकलव्य..! माजी दिग्गजाचे व्हिडीओ पाहून शिकला गोलंदाजी, आयपीएलचे ‘हे’ संघ बनवणार कोट्याधीश