चेन्नई । भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आर अश्विनची निवड दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत न झाल्यामुळे तो देशांतर्गत मोसमात लवकरच सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसेल.
तो या स्पर्धेत भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयसह तामिळनाडूच्या संघातून खेळताना दिसेल. विजय हजारे ट्रॉफीच्या साखळी फेरीचे सामने ५ ते १४ फेब्रुवारी या काळात होणार आहे. तामिळनाडू या स्पर्धेत क गटात आहे.
१६ सदस्यीय तामिळनाडूच्या संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू विजय शंकर करणार आहे. दिनेश कार्तिक सध्या वनडे संघात असल्यामुळे तो या संघाचा भाग नाही.
बाबा अपराजित या संघाचे उपकर्णधारपद भूषविणार आहे.
अश्विन ह्यावर्षी तामिळनाडूकडून रणजी स्पर्धेत दुखापतीमुळे भाग घेऊ शकला नाही.
विजय हजारे ट्रॉफीसाठी तामिळनाडूचा संघ:
विजय शंकर (कर्णधार), बाबा अपराजित (उपकर्णधार), आर अश्विन, एम विजय, एम कौशिक गांधी, एम एस वॉशिंग्टन सुंदर, गंगा श्रीधर राजू, बी अनिरुद्ध सीताराम, एन जगदीशन (यष्टीरक्षक), के विग्नेश, वाय वोमहेष, अश्विन क्रिस्ट, जे कौशिक, आर साई किशोर, राहील शाह. एम अभिनव