डेहराडून: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राहुल बैठा व अंजली सेमवाल यांना रौप्य, तर सूरज चंदने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राला स्क्वॉशमध्ये सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवून दिले.
राजीव गांधी स्टेडियममध्ये संपलेल्या स्क्वॅशमधील पुरुषांच्या एकेरीत महाराष्ट्राच्या राहुल याला आंतरराष्ट्रीय खेळाडू व अग्रमानांकित खेळाडू व्ही. सेंथिलकुमार याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. चुरशीच्या लढतीनंतर सेंथिलकुमार याने हा सामना 11-6, 11-9, 11-7 असा जिंकला. या लढतीमध्ये सेंथिल कुमार याने परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. राहुल याने क्रॉस कोर्ट फटके मारीत चांगली लढत दिली. मात्र अखेर त्याला पराभव पत्करावा लागला.
महिलांच्या एकेरीत अंजली हिला गोव्याची खेळाडू आकांक्षा साळुंखे हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. एकतर्फी झालेल्या लढतीत आकांक्षा हिने 11-6, 11-5, 11-4 असा विजय मिळवताना चतुरस्त्र खेळाचा प्रत्यय घडविला. अंजली हिने परतीचे काही सुरेख फटके मारले. मात्र, आकांक्षाच्या वेगवान खेळापुढे तिला अपेक्षेइतका प्रभाव दाखवता आला नाही.
राहुल हा व्यावसायिक खेळाडू असून, तो जे एस डब्ल्यू वासिंद अकादमीत सराव करीत आहे. आजपर्यंत या 24 वर्षे खेळाडूने अनेक पदके जिंकली आहेत. उपांत्य फेरीत पराभूत होणार्या सूरज याला कांस्यपदक बहाल करण्यात आले. तो देखील मुंबईचा खेळाडू असून सोमय्या महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे. त्याने आजपर्यंत या स्पर्धांमध्ये 6 पदके जिंकली आहेत. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत त्याने सांघिक विभागात 2 सुवर्ण पदके जिंकली आहेत.
“माझ्या साठी आज येथे मिळवलेले रौप्यपदकही महत्त्वाचे आहे कारण सेंथिल कुमार हा अतिशय अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला मी लढत देऊ शकलो याचेच मला समाधान आहे. येथील अनुभव मला भावी कारकीर्दीसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे.” असे राहुल याने सांगितले
महिलांच्या एकेरीत अंजली हिला गोव्याची खेळाडू आकांक्षा साळुंखे हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. एकतर्फी झालेल्या लढतीत आकांक्षा हिने 11-6, 11-5, 11-4 असा विजय मिळवताना चतुरस्त्र खेळाचा प्रत्यय घडविला. अंजली हिने परतीचे काही सुरेख फटके मारले. मात्र, आकांक्षाच्या वेगवान खेळापुढे तिला अपेक्षेइतका प्रभाव दाखवता आला नाही. अंजली ही मुंबई येथे जे एस डब्ल्यू वासिंद अकादमी प्रशिक्षण घेत असून तिने शिव नाडर विद्यापीठातून व्यवस्थापन शास्त्रात पदवी संपादन केली आहे. या स्पर्धेतील तिचे हे पहिलेच वैयक्तिक पदक आहे. तिने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. तसेच 2 वेळा तिने श्रीलंकेत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय निमंत्रित स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले. हाँगकाँग मध्ये झालेल्या जागतिक चषक स्पर्धेत तिने सातवा क्रमांक मिळविला होता.
“माझी प्रतिस्पर्धी आकांक्षा ही व्यावसायिक खेळाडू असून ती परदेशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असते. त्यामुळे तिच्याविरुद्ध मी माझ्या क्षमतेनुसार चांगली लढत दिली. अर्थात या स्पर्धेत माझे हे वैयक्तिक गटातील पहिलेच पदक असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. येथील रौप्य पदक मला पुढच्या करिअरसाठी प्रेरणादायक आहे” असे अंजली हिने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
किंग कोहलीने जिंकली चाहत्यांची मनं, घरात बोलावून दिला ऑटोग्राफ!
IND vs ENG; रवींद्र जडेजा वनडे मालिकेत रचणार इतिहास, करणार हा भीमपराक्रम..!
3 भारतीय फलंदाज ज्यांनी टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये कमी डावात गाठला 2,500 धावांचा टप्पा