नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने म्हटले आहे की त्याच्या निवृत्तीनंतर काय करायचे याचा पर्याय शोधण्यासाठी माजी दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांच्या सल्ल्याची त्याला मदत झाली.
द्रविड (Rahul Dravid) म्हणाला की, तो थोडा भाग्यवानही होता. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात, तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आणि सह प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता.
कारकिर्दीच्या शेवटी कपिल देव यांनी दिला सल्ला
“जेव्हा माझी कारकीर्द संपुष्टात येत होती, तेव्हा बरेच पर्याय होते आणि काय करावे हे मला माहीत नव्हते. त्यावेळी कपिल देव (Kapil Dev) यांनी मला हा सल्ला (Advice) दिला होता,” असे यूट्यूब चॅनेल इनसाइड आऊटवर भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यूवी रमण यांच्याशी बोलताना द्रविडने सांगितले.
“मी कुठेतरी त्यांच्याशी भेटलो आणि त्यांनी मला म्हटले, ‘राहुल, काहीही घाईत करू नकोस. बाहेर जा आणि फक्त काही वर्ष घालव तसेच वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घे आणि पहा की तुला काय आवडते,’ मला वाटले की हा चांगला सल्ला आहे,” असेही राहुल पुढे म्हणाला.
समालोचन केले परंतु प्रशिक्षण चांगले वाटले
द्रविडने म्हटले की सुरुवातीला त्याला समालोचन करायला आवडायचे. परंतु नंतर खेळापासून थोडे दूर राहिल्यासारखे वाटले.
“खेळात सामील होणे आणि मुलांबरोबर जोडून राहणे या गोष्टीने मला अधिक समाधान दिले. भारत अ आणि १९ वर्षांखालील (अंडर-१९) संघाला प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली, तेव्हा मला प्रशिक्षणाची बाजू आवडली आणि मला यामध्ये सामील केले,” असेही तो पुढे म्हणाला.
‘प्रशिक्षणाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला’
“मला वाटले की सुरुवात करण्यासाठी ही चांगली जागा आहे आणि मी हे निवडले. तेव्हापासून मी याचा आनंद घेतला आहे. मला खूप समाधान वाटत आहे,” असे तो म्हणाला.
“विशेष म्हणजे भारत अ, अंडर- १९ किंवा राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) असो ही प्रशिक्षणातील विकासाची बाजू आहे. यामुळे मला त्वरित निकालांची चिंता न करता बर्याच खेळाडूंबरोबर काम करण्याची संधी दिली. मला वाटते की हे माझ्यासाठी काम करण्यासाठी एक चांगली जागा आहे,” असेही प्रशिक्षणाबद्दल बोलताना तो म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-हे ३ संघ जिंकू शकतात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
-सप्टेंबरनंतर टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार नाही तो लोगो
-७० वर्षांनंतर रोस्टन चेजने मँचेस्टरमध्ये घडवला इतिहास; केला हा नवा विक्रम