२० जून १९९६ हा दिवस भारतीय क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिणारा ठरला. याच दिवशी इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी कसोटी पदार्पण केले.
विशेष म्हणजे ह्या सामन्यात गांगुलीने १३१ तर द्रविडने ९५ धावा केल्या. संजय मांजरेकर आणि सुनील जोशी या दोन खेळाडूंच्या जागी या दोघांना संधी देण्यात आली होती. विशेष म्हणजे कुंबळे, सचिन. द्रविड आणि गांगुलीने एकत्र खेळलेला हा पहिला कसोटी सामना.
पुढे जाऊन सचिन, गांगुली, कुंबळे आणि द्रविड या सर्वांनीच भारताचं कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व केलं. द्रविडने त्यानंतर भारताकडून तब्बल १६४ कसोटी सामने खेळले तर गांगुलीने ११३ सामने खेळले. द्रविडपेक्षा फक्त ४ खेळाडूंनी जास्त कसोटी सामने खेळलेआहे .
गांगुलीने या सामन्यात शतक करतानाच पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात विकेट्स सुद्धा घेतल्या होत्या.