भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा मुलगा समितने कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षांखालील आंतर-विभागीय स्पर्धेत द्विशतक करत त्याची छाप सोडली आहे.
त्याने या स्पर्धेत वाइस प्रेसिडेंड इलेव्हन संघाकडून खेळताना धारवाड विभागाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात 250 चेंडूत 22 चौकारांसह 201 धावांची द्विशतकी खेळी केली आहे. तसेच त्याने याच सामन्यात दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी करताना 82 चेंडूत 15 चौकारांसह नाबाद 94 धावांची खेळी केली.
विशेष म्हणजे तो वाइस प्रेसिडेंड इलेव्हन संघाचा कर्णधार आहे.
या सामन्यात समितसह श्रेयस मोहंतीने पहिल्या डावात 78 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर वाइस प्रेसिडेंड इलेव्हन संघाने पहिल्या डावात 7 बाद 372 धावा केल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या धारवाड विभागाकडून उत्कर्ष शिंदेने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्याव्यतिरक्त अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. त्यामुळे त्यांचा पहिला डाव सर्वबाद 124 धावांवर संपुष्टात आला. यामुळे समित कर्णधार असलेल्या वाइस प्रेसिडेंड इलेव्हन संघाने 248 धावांची मोठी आघाडी मिळवली.
दुसऱ्या डावात वाइस प्रेसिडेंड इलेव्हन संघाकडून समितला प्रणव भट्टाडने नाबाद 71 धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून 148 चेंडूत 159 धावांची नाबाद भागीदारी रचली. मात्र हा सामना अनिर्णित राहिला.
हे ४ मुंबईकर खेळाडू आयपीएल २०२०मध्ये खेळणार दिल्ली कॅपिटल्सकडून!
वाचा👉https://t.co/yAJbo8dM1t👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
मुंबईकर झालेल्या या खेळाडूला बुमराह म्हणतो,''तरीही तूला माझा सामना करावाच लागेल"
वाचा👉https://t.co/MBtm206gKM👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019