भारतीय क्रिकेटमध्ये सध्या माजी क्रिकेटपटूंच्या मुलांनी नावे गाजत आहेत. यात आता भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचाही मुलगा क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसून आला आहे.
समित द्रविड सध्या शालेय स्तरावर क्रिकेट खेळतो. समित हा 14 वर्षांखालील वयोगटातून मल्ल्या अदिती इंटरनॅशनल स्कूल संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने नुकतेच बंगळूरुमधील कॉटनियन शिल्ड स्पर्धेत त्याच्या संघाला अष्टपैलू खेळी करत विजय मिळवून दिला आहे.
समितने या सामन्यात केंब्रिज पब्लिक स्कूल विरुद्ध नाबाद 51 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना फक्त 9 धावा देत 3 विकेट घेतल्या आहेत.
समितने याआधीही क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. जानेवारीमध्ये 14 वर्षांखालील बीटीडब्ल्यू कप स्पर्धेत त्याने शतकी खेळी करत त्याच्या संघाला सामना जिंकून दिला होता.
तसेच 2015 मध्ये त्याला गोपालन क्रिकेट चॅलेंज स्पर्धेत 12 वर्षांखालील वयोगटातील सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला होते.
काही दिवसांपूर्वी सचिन तेंडूलकरच्या मुलानेही 19 वर्षांखालील भारतीय संघात पदार्पण केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–लाॅर्ड्सवर गांगुलीने या खेळाडूला दिला होता टी-शर्ट काढण्याचा सल्ला
–कोहलीवर टीका करण्यापूर्वी तुझे संघातील स्थान पहा, इंग्लंडच्या गोलंदाजावर झहीर कडाडला!
–इम्रान खानबद्दल तब्बल ६वर्षांपूर्वी केलेली गावसकरांची भविष्यवाणी अखेर खरी ठरली