आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील २७ सामने झाले आहेत. दरम्यान स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने ७ सामने खेळले आहेत आणि त्यातील केवळ ३ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. या तिनही सामन्यात राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियाने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
२२ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध राजस्थानने हंगामातील पहिला सामना खेळला होता. या सामन्यात राजस्थानने चेन्नईला १६ धावांनी पराभूत केले होते. त्यावेळी तेवतियाला फलंदाजीत खास कामगिरी करता आली नव्हती. पण त्याने गोलंदाजी करताना चेन्नईच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. ४ षटकात ३७ धावा देत त्याने हा कारनामा केला होता.
त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात तेवतियाने नेत्रदिपक प्रदर्शन केले होते. या सामन्यात त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत एका षटकात ५ षटकार मारत सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच केवळ ३१ चेंडूत या धुरंधरने ५३ धावा कुटल्या होत्या. त्याच्या या योगदानामुळे राजस्थानने पंजाबला ४ विकेट्सने चित केले होते.
तर नुकत्याच रविवारी (११ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानने ५ विकेट्सने बाजी मारली. विशेष म्हणजे, तेवतियाला या सामन्यातील त्याच्या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने खालच्या फळीत फलंदाजी करताना राजस्थानला हारता सामना जिंकून दिला. या सामन्यात त्याने २८ चेंडूत नाबाद राहत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४५ धावा ठोकल्या होत्या.
योगायोगाने राजस्थानने या हंगामात जेवढेही सामने गमावले आहेत. त्या सामन्यात तेवतियाला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी करता आली नव्हती.
यावरुन असे म्हणणे वावगे ठरणार नाही की, जेव्हा जेव्हा राहुल तेवतियाची जादू चालते. तेव्हा तेव्हा राजस्थानचा विजय निश्चित असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे मुंबईकर! दिल्लीविरुद्धचा सामना रोहित शर्मासाठी ठरला खूपच ‘खास’, कसं ते पाहा
अखेर मुंबई विरुद्ध मुंबईकर अजिंक्य रहाणेला मिळाली संधी; पाहा असा आहे ११ जणांचा दिल्ली संघ
बेंगलोरविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर ‘या’ माजी क्रिकेटरचा रायडूवर चढला पारा, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा