इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्या दरम्यान खेळला गेला. पंजाबच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत २२१ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात, राजस्थान रॉयल्सचा संघ हे भलेमोठे आव्हान पार करू शकला नाही. त्यांचा केवळ ४ धावांनी पराभव झाला. यासह पंजाबने आपल्या हंगामाची विजयी सुरुवात केली. मात्र, या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या राहुल तेवतियाने एक नेत्रदीपक झेल घेत सर्वांची मने जिंकली.
तेवतियाचा डोळ्याचे पारणे फेडणारा झेल
प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर केएल राहुल, ख्रिस गेल व दीपक हुडा यांनी तुफानी फटकेबाजी केली. या तिघांच्या योगदानामुळे पंजाबने निर्धारित २० षटकात २२१ धावा फटकावल्या. राहुलने ९१, हुडाने ५४ तर गेलने ४० धावांचे योगदान दिले. राजस्थानसाठी युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने सर्वाधिक ३ बळी मिळवले.
पंजाबच्या डावाच्या अखेरच्या षटकात पदार्पण करणारा चेतन सकारिया गोलंदाजी करण्यासाठी आला. केएल राहुलने या चेंडूवर चौकार वसूल केला. पुढील चेंडूवर षटकार ठोकण्याचा प्रयत्न राहुलने केला. त्याने उंचावरून मारलेला फटका लॉंग ऑनला उभ्या असलेल्या राहुल तेवतियाच्या दिशेने गेला. तेवतियाने हवेत झेपावत झेल टिपला. मात्र, आपण सीमारेषेपार जाऊ अशी शंका आल्याने त्याने चेंडू पुन्हा हवेत फेकला व नंतर सीमारेषे बाहेर येऊन झेल घेत राहुलला बाद केले.
https://twitter.com/JofraArcher8/status/1381639255013818371
#RRvPBKS What a Catch Rahul Tewatia #Rahulttewatia pic.twitter.com/WLp6pwuB2c
— Yash Manglani (@YashManglani17) April 12, 2021
वारंवार पहायला मिळतात असे झेल
आधुनिक क्रिकेटमध्ये क्रिकेटपटू अत्याधिक तंदुरुस्त झाल्याने अशा प्रकारचे झेल वारंवार पाहण्यास मिळतात. ब्रेंडन मॅक्युलमने सर्वप्रथम असा झेल टिपला होता. त्यानंतर, कायरन पोलार्ड, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्टिन गप्टिल हे अशा तऱ्हेचे झेल सातत्याने घेत असलेले पाहायला मिळतात.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…याचे सर्व श्रेय एमएस धोनीला’, बटलरने केले कौतुक
अविश्वसनीय! चेतन सकारियाने आयपीएल पदार्पणातच घेतला डोळ्यांचे पारणे फेडणारा भन्नाट झेल