आयपीएल २०१८ साठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक क्रिकेटपटूंना कोटींमध्ये बोली लागली. यात अनेक खेळाडूंची तर नावेही अपरिचित होती.
या खेळाडूंमध्ये अर्यमान बिर्ला असेही एक नाव आहे, ज्याचे वडील गर्भश्रीमंत उद्योजक आहेत. आर्यमान हा कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे. कुमार मंगलम बिर्ला हे आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष आहेत.
बिर्ला ग्रुप हे भारतातील खूप मोठे नाव असले तरी लिलावाच्या वेळी मात्र अर्यमानच्या बोलीवर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही. अर्यमानवर लिलावाच्या पहिल्या फेरीत कोणीही बोली लावली नव्हती, पण शेवटच्या फेरीत त्याला राजस्थान रॉयल्सने त्याच्या मूळ किमतीपेक्षा १० लाख जास्त देत ३० लाखांमध्ये संघात सामील करून घेतले.
आर्यमान हा अष्टपैलू खेळाडू असून तो मध्यप्रदेश संघाकडून खेळतो. त्याने आत्तापर्यंत प्रथम श्रेणीचा एकच सामना खेळला असून त्याने दोन डावात मिळून २२ धावा केल्या होत्या. परंतु त्याला या सामन्यात एकही विकेट घेता अली नव्हती. २० वर्षीय अर्यमान डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि स्लो लेफ्ट हॅन्ड आर्थोडॉक्स अशी त्याची गोलंदाजीची शैली आहे.