आयपीएलचा १३ वा हंगाम संपूण २ महिनेच उलटत नाहीत की आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. बुधवारी सर्व आयपीएलमधील सहभागी फ्रँचायझींनी त्यांच्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या नुसार राजस्थान रॉयल्सने त्यांचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला संघातून मुक्त केले आहे. याबरोबर संजू सॅमसनला २०२१ आयपीएल मोसमासाठी नवा कर्णधार म्हणून घोषित केले आहे.
याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली. त्यांनी स्मिथबद्दल ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘कायमस्वरुपी रॉयल. स्मिथ तुझ्या आठवणी कायमस्वरुपी बरोबर असतील.’
Forever a Royal…💗
Some special memories Smudge. 🤝#RoyalsFamily | @stevesmith49 pic.twitter.com/esOSQVtAtP
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 20, 2021
तसेच मागील अनेक वर्षांपासून संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याच्याबद्दल ट्विट करताना राजस्थानने म्हटले आहे की ‘नवा अध्याय सुरु होत आहे. तुमच्या राजस्थान रॉयल्सच्या नव्या कर्णधाराचे स्वागत करा.’
A new chapter begins now. 🚨
Say hello to your Royals captain. #SkipperSanju | #HallaBol | #IPL2021 | #IPLRetention | @IamSanjuSamson pic.twitter.com/pukyEiyb1B
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 20, 2021
आयपीएल 2020 मध्ये स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने 6 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर 8 सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थान रॉयल्स हा संघ सलग तिसर्यांदा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाची नव्याने बांधणी करण्याची शक्यता आहे. स्टीव्ह स्मिथ 13 व्या हंगामात व्यक्तीगत प्रदर्शन आणि नेतृत्वात सुद्धा सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळेच त्याला संघातून बाहेर केले असण्याची शक्यता आहे.
स्टिव्ह स्मिथचा स्वत:चा खराब फॉर्म सुद्धा या निर्णयाचे सर्वात प्रमुख कारण असू शकतो. त्याने मागील हंगामात 25.91 च्या सरासरीने 311 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याच्या तीन अर्धशतकांचा समावेश होता.