भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज आणि भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद अजूनच चिघळत चालला आहे. आता या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा समोर आला आहे.
पोवार यांनी मितालीने बीसीसीआयला लिहलेल्या पत्रातील विधाने नाकारली आहेत. तसेच तिला संघात न घेतल्याचे कारणही स्पष्ट केले आहे.
“मितालीने बीसीसीआयला लिहलेल्या पत्रातील आरोप मी अमान्य करतो”, असे पोवार यांनी ट्विट करत जाहिर केले आहे.
I was shocked to read PTI story about my meeting with the BCCI officials. I totally deny the contents in the story.
— RAMESH POWAR (@imrameshpowar) November 28, 2018
मितालीला काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 11 जणींच्या भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे अनेकांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.
याबाबत मितालीने बीसीसीआयला पत्र लिहून भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समिती (सीओए) सदस्य डायना एडलजी यांच्यावर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला आहे.
या पत्रामधील पोवार यांच्याबद्दल मितालीने जी विधाने केली आहेत त्या पोवार यांनी अमान्य केल्या आहेत. तसेच त्यांनी बीसीसीआय समोर एक रिपोर्टही सादर केला आहे. ज्यामध्ये मितालीला तिच्या कमी स्ट्राइक रेटमुळे संघात घेतले नाही असे सांगितले.
पोवार यांनी बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी आणि व्यवस्थापक सबा करिम यांची भेट घेतली. तसेच मितालीचे पत्र मिडियाला कसे मिळाले हा प्रश्नही बीसीसीआयचे सेक्रेटरी अमिताभ चौधरी यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–ज्या विक्रमासाठी सचिनला २१ वर्ष लागली तो विराट केवळ ७ वर्षांत मोडणार
–आॅस्ट्रेलियाच्या १९ वर्षीय गोलंदाजाने घेतली किंग कोहलीची विकेट
–बंदी घातेलला स्टिव स्मिथ खेळणार चौथ्याच संघाकडून