वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), मुंबई (Mumbai) येथे रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेतील सहाव्या फेरीत मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश (Mumbai vs Uttar Pradesh) संघात सामना पार पडला. हा सामना अनिर्णित (Match Drawn) राहिला.
या सामन्यानंतर मुंबईकडून त्रिशतक करणाऱ्या सर्फराज खानने (Sarfaraz Khan) एका गोष्टीचा खुलासा केला आहे. त्याने सामन्यानंतर सांगितले की सोमवारी(20 जानेवारी) त्रिशतक करण्याच्या आदल्या दिवशी रात्री त्याला 102 डिग्री ताप होता.
“माझी तब्येत 2-3 दिवसांपासून खराब होती. परंतु तेव्हा संघाच्या हितासाठी मला असे वाटले की जर मी मैदानावर उतरलो आणि एका बाजूने टिकून राहिलो तर सामना आमच्या बाजूने झुकू शकतो,” असे सर्फराज यावेळी म्हणाला.
“दुसऱ्या दिवशीच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी माझी तब्येत थोडी बरी होती. परंतु लंच ब्रेकनंतर पुन्हा ताप आला. त्यानंतर मी हार मानली नाही आणि संघासाठी मैदानावर टिकून राहिलो,” असेही सर्फराज यावेळी म्हणाला.
वानखेडेवर केलेल्या त्रिशतकी खेळीबद्दल विचारले असता सर्फराज म्हणाला की, “वानखेडेच्या बाजूलाच आझाद मैदान आहे. जिथे मी माझ्या आयुष्यातील बरेचसे क्रिकेट खेळलो आहे. मी जेव्हा वानखेडे स्टेडियमकडे पहायचो तेव्हा मी विचार करत असे की, एक दिवस लोक माझ्यासाठी जोर-जोराने जयघोष करतील. आज तो दिवस आला आहे. तरीही मला असे वाटले नव्हते की मी त्रिशतक करू शकेल.”
WATCH: The Sarfaraz Khan redemption story 🔥🔥
Mumbai to Uttar Pradesh and back: Sarfaraz Khan recounts his journey to a special triple ton and how he chose runs over food. 👏👏 @paytm #RanjiTrophy #MUMvUP
Full video ▶️▶️https://t.co/YB70HlkvSb pic.twitter.com/ZhGwucSwAh
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 22, 2020
मुंबईकडून खेळताना सरफराजने उत्तरप्रदेशविरुद्ध 391 चेंडूत 76.98 च्या स्ट्राईक रेटने 301 धावा केल्या आहेत. यामध्ये 8 षटकार आणि 30 चौकारांचा समावेश आहे.
त्याचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेच त्रिशतक आहे. विशेष म्हणजे याआधी कधीही त्याने प्रथम श्रेणीमध्ये द्विशतकी खेळीही केली नव्हती. तो रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक करणारा मुंबईचा 8 वा फलंदाजही ठरला आहे.
पहिल्या टी२० सामन्यात दिसू शकतात रोहितसह ४ मुंबईकर
वाचा👉https://t.co/swieao8QOi👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @MumbaiCricAssoc— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020
बीसीसीआयने करारही केला नाही, आता विराट धोनीचं यात विक्रमातून नाव हटवणार
वाचा👉https://t.co/CVYWczpYoj👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020