भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने रणजी ट्राॅफीमध्ये खेळत असताना एक खास विक्रम केला आहे. रणजी ट्राॅफी स्पर्धेत सौराष्ट्रकडून खेळणार्या चेतेश्वर पुजाराने शनिवारी(11 जानेवारी) कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात प्रथम श्रेणी कारकीर्दीतील 50 वे शतक पूर्ण केले आहे.
या शतकासह पुजारा माजी कर्णधार सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.
राजकोटच्या माधवराव सिंधिया क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवसाच्या अखेरीस चेतेश्वर पुजाराने नाबाद 162 धावा केल्या आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 50 वे शतक पूर्ण केले. त्यामुळे आता पुजारा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक शतके ठोकणारा नववा भारतीय खेळाडू बनला आहे.
पुजाराच्या आधी हा पराक्रम माजी कर्णधार सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वासिम जाफर, दिलीप वेंगसरकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मोहम्मद अझरुद्दिन यांनी केला आहे.
सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकरने आपल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत प्रत्येकी 81 शतके ठोकली आहेत. तर राहुल द्रविडने 68 शतके केली आहेत.
प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय क्रिकेटपटू –
81 – सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर
68 – राहुल द्रविड
60 – विजय हजारे
57 – वासिम जाफर
55 – दिलीप वेंगसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण
54 – मोहम्मद अझरुद्दिन
50 – चेतेश्वर पुजारा
अजिंक्य रहाणेच्या त्या प्रश्नावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने दिले उत्तर
वाचा- 👉 https://t.co/Yy0uKVYZOr👈#म #मराठी #Cricket @ajinkyarahane88 @sachin_rt— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020
१९ वर्षांखालील विश्वचषक खेळण्याआधीच टीम इंडियाला बसला मोठा धक्का
वाचा- 👉 https://t.co/0XrnmrIwoK👈#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020