भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे, तालिबान आणि सरकारी सैन्य दलांमध्ये भीषण युद्ध सुरु असून, तालिबान्यांनी देशाच्या बाहेरील भागांवर कब्जा केला आहे आणि आता ते राजधानीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, तालिबानने एकतर अफगाणिस्तानचा ८० टक्के भाग काबीज केला आहे किंवा त्यासाठी युद्ध सुरू आहे. अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर परिस्थिती बिघडली. आता अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खान याने आपल्या देशाला वाचवण्यासाठी जागतिक नेत्यांना एक भावनिक आवाहन केले आहे.
राशिदचे जागतिक नेत्यांना आवाहन
अफगाणिस्तानचा बावीस वर्षीय स्टार फिरकीपटू व टी२० संघाचा कर्णधार असलेल्या राशिदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले, ‘जागतिक नेत्यांनो, माझा देश संकटात आहे. मुले आणि महिलांसह हजारो निरपराध लोक दररोज शहीद होत असून, घरे आणि मालमत्ता नष्ट होत आहेत.’
भारतात आयपीएल, पाकिस्तानमध्ये पीएसएल, ऑस्ट्रेलियाच्या बीबीएलसह जगभरातील अनेक फ्रँचायझी लीगमध्ये खेळणाऱ्या या लेगस्पिनरने पुढे लिहिले की, ‘या हल्ल्यांमुळे हजारो कुटुंबे विस्थापित झाली आहेत. आम्हाला अडचणीत सोडू नका. अफगाणांना वाचवा. अफगाणिस्तान नष्ट होऊ देऊ नका. आम्हाला शांतता हवी आहे.’
Dear World Leaders! My country is in chaos,thousand of innocent people, including children & women, get martyred everyday, houses & properties being destructed.Thousand families displaced..
Don’t leave us in chaos. Stop killing Afghans & destroying Afghaniatan🇦🇫.
We want peace.🙏— Rashid Khan (@rashidkhan_19) August 10, 2021
सैन्य आणि तालिबानमध्ये सुरु आहे युद्ध
अफगाणिस्तानचे सैन्य आणि तालिबान यांच्यातील युद्धाने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. मोठ्या संख्येने मुले आणि महिलांना लक्ष्य केले जात आहे. मुलांना जबरदस्तीने सशस्त्र संघटनांमध्ये भरती केले जातेय. अफगाणिस्तानमधील युनिसेफचे प्रतिनिधी हर्वे लुडोविच यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ७२ तासांत अफगाणिस्तानमध्ये २० मुलांचा मृत्यू झाला असून, १३० जण जखमी झाले आहेत. त्याचवेळी, यूएनएचसीआरच्या मते, गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये ३५,००० हून अधिक कुटुंबांना बेघर केले गेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्ड्स कसोटीसाठी विराट सेना सज्ज! बीसीसीआयने शेअर केली छायाचित्रे
जसप्रीत बुमराहचे ‘ते’ गूढ ट्विट होतेय व्हायरल
बार्मी आर्मीने केला खोडसाळपणा! ‘त्या’ छायाचित्रामुळे उठले वादळ, विराटला केले टार्गेट