---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर दगडफेक करणाऱ्याला अश्विनचे उत्तर

---Advertisement---

काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. मैदानावरून जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाची बस जेव्हा हॉटेलकडे जात होती तेव्हा एका व्यक्तीने बसवर दगड फेकला.

यामुळे बसची काच तर फुटलीच शिवाय बसमध्ये अनेक काचेचे तुकडे पाहायला मिळाले. यावर सलामीवीर ऍरॉन फिंचने नाराजी व्यक्त करत ट्विट केले होते.

या कृतीच्या विरुद्ध भारताच्या अष्टपैलू आर अश्विनने आवाज उठवला आहे. तसेच आपली ही संस्कृती नसल्याचंही सांगितलं आहे.

अश्विन म्हणतो,

आपण असा देश आहे जो आपल्या पाहुण्यांचा अतिशय चांगला सन्मान करतो. त्यांना अतिशय चांगली वागणूक देतो. ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर दगडफेक ही दुर्दैवी बाब आहे. सर्वजण मिळून आपण जबाबदार बनूया. आपण आपण हे करू शकतो.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment