न्यूझीलंडविरुद्धच्या भारतीय टी२० संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय टी२० संघाचे कर्णधारपद सोडलेल्या कोहलीला १७ नोव्हेंबरपासून जयपूर येथे सुरू होणाऱ्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या नावाची टी-२० कर्णधारपदाची घोषणा होताच क्रिकेट वर्तुळात आजी-माजी कर्णधाराबाबत विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
यातच, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने विराट कोहलीच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आणि एक नेता म्हणून त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी असल्याचे सांगितले आहे.
टी२० कर्णधार म्हणून विराट कोहलीची टी२० विश्वचषक २०२१ शेवटची स्पर्धा होती. टी२० विश्वचषकानंतर या प्रकारातील संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे त्याने आधीच सांगितले होते. रवींद्र जडेजा १९ वर्षांखालील स्तरापासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे, तो कोहलीला चांगला ओळखतो. याशिवाय जडेजाने सपोर्ट स्टाफचेही कौतुक केले आहे.
तो म्हणाला, विराट कोहलीने उत्कृष्टपणे कर्णधारपद भूषवले आहे. मी त्याच्यासोबत खूप खेळलो आहे आणि मला खूप मजा आली आहे. सपोर्ट स्टाफही बराच काळ आमच्यासोबत होता आणि त्यांनीही उत्तम काम केले आहे. आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी केली आहे आणि पुढेही आम्हाला अशीच गती कायम ठेवायची आहे.
विराट कोहलीनंतर रोहित शर्मा टी२० संघाचा कर्णधार झाला आहे, तर केएल राहुलची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. खुद्द विराट कोहलीनेही याचे संकेत दिले होते. नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने भारतीय संघाच्या पुढील कर्णधारावर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता, रोहित शर्मा संघात आहे आणि तो बर्याच दिवसांपासून सर्व गोष्टी पाहत आहे. भारतीय क्रिकेट चांगल्या हातात आहे.
रोहित शर्माची टी२० मध्ये कर्णधार म्हणून कामगिरी खूप चांगली आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलमध्ये पाच वेळा जेतेपद मिळवून दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने दाखवली ‘नृत्यकला’, तिच्या डान्स स्टेप्स पाहून व्हाल घायाळ, पाहा व्हिडिओ
टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान लढतीने केला मोठा रेकॉर्ड; तब्बल ‘एवढ्या’ लोकांनी पाहिला सामना