भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा हा त्याच्या वेगवान थ्रो आणि दमदार क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. मैदानावर फलंदाजांना धावा न करू देणाऱ्या जडेजाने एकदा सोशल मीडियावर अशी चूक केली होती, ज्यामुळे त्याला लोकांच्या थट्टेला सामोरे जावे लागले होते. Ravindra jadeja and sarah taylor tweeter chat become viral.
झाले असे की, २०१४ साली इंग्लडची माजी महिला यष्टीरक्षक फलंदाज सारा टेलरने जडेजाला टॅग करत अनेक ट्विट केले होते. त्यांच्या ट्विटवरून सर्वांना अंदाजा लागला होता की, ते दोघेही ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्या स्विमिंग पूलवर भेटणार आहेत. त्यांचे ते ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
यष्टीमागे फलंदाजांना बाद करणाऱ्या साराची भारताच्या अनेक माजी यष्टीरक्षक क्रिकेटपटूंशी तुलना केली जात असायची. २०१४मध्ये ट्विटरवरील एका चर्चेमुळे साराचे नाव जडेजाशी जोडले गेले. त्यावेळी जडेजा ट्विटरवर जास्त सक्रिय नव्हता.
२०१४ला भारतीय पुरुष संघ टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. त्याबरोबरच महिला टी२० विश्वचषकातही इंग्लंड महिला संघानीही त्यांचा अंतिम सामना गमावला होता. त्यांच्या पराभवानंतर जडेजाने साराला थेट ट्विटरवर मेसेज केला. मात्र, तो साराला फॉलो करत नसल्याने साराला त्याला मेसेज करता येत नव्हता. म्हणून कंटाळून साराने जडेजाला थेट टॅग करत ट्विट करायला सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे, हे ट्विट सर्वांना सहज दिसू शकत होते.
सुरुवातीला तर त्यांचे बोलणे पाहून सर्वांना असे वाटू लागले होते की, ते एकमेकांच्या प्रदर्शनाविषयी बोलत आहेत. पुढे बोलताना जडेजाने साराला सकाळी १० वाजता स्विमिंग पूलवर भेटायला येण्याचे ट्विटही केले. शेवटी त्यांना समजले की, आपले मेसेज चाहत्यांना दिसत आहेत. त्या दोघांनी याविषयावरही चर्चा केली की चाहत्यांना त्यांचे ट्विट दिसत आहेत. म्हणून साराने पुढे जडेजाला तिला फॉलो करण्यास सांगितले.
पण तेव्हापर्यंत बऱ्याच जणांनी त्यांचे ट्विट वाचले होते. अनेकांनी तर ते व्हायरल करण्यासही सुरुवात केली. जडेजाच्या त्या ट्विटमुळे चाहत्यांनी त्याची खूप मजा घेतली होती.
साराचे नाव एकदा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबतही जोडले गेले होते. पण, याविषयीची अधिकृत माहिती समोर आली नाही. जडेजानेही पुढे रिवा सोलंकीसोबत लग्न केले.
इंग्लंडकडून १० कसोटी सामन्यात साराने ३०० धावा केल्या आहेत. तर, १२६ वनडे सामन्यात ४०५६ धावा आणि ९० टी२० सामन्यात २१७७ धावा केल्या आहेत. २०१९मध्ये साराने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली.
ट्रेंडिंग घडामोडी-
महाराष्ट्र पोलीसांच्या कार्याला विराट, झहीरने केला असा सलाम
केएल राहुल म्हणतो, या भारतीय गोलंदाजासाठी यष्टीरक्षण करणे महाकठीण
केएल राहुल म्हणतो, हा फलंदाज माझा विशेष आवडता