भारतीय संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने एकाच षटकात ६ षटकार मारून नवा विक्रम केला आहे. सलग ६ षटकार मारणारा तो जगातील ७वा खेळाडू ठरला तर एकाच षटकात ६ षटकार मारणारा ५वा खेळाडू ठरला आहे.
सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनने आयोजित केलेल्या इंटर डिस्ट्रिक्ट टी२० स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनने पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन केले असून जामनगर जिल्ह्याकडून खेळताना जडेजाने ही कामगिरी केली आहे.
या सामन्यात त्याने ६९ चेंडूत १५४ धावा करताना ब गटात जामनगरला १२१ धावांनी अमरेलीवर विजय मिळवून दिला आहे. त्याच्या ह्याच खेळीच्या जोरावर जामनगरने ६ बाद २३९ धावा केल्या होत्या.
१५ चौकार आणि १० षटकार खेचणारा जडेजा १९व्या षटकात धावबाद झाला.
यापूर्वी दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर दोन खेळाडूंनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच षटकात ६ षटकार मारले आहेत.
युवराज सिंग आणि हर्षल गिब्स यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात तर सर गारफिल्ड सोबर्स आणि रवी शास्त्री यांनी प्रथम श्रेणी सामन्यात ही कामगिरी केली आहे.
मिस्बाह उल हक आणि अॅलेक्स हेल्स यांनीही सलग ६ षटकार मारले आहेत परंतु ते एकाच षटकात मारले नाहीत.