रवींद्र जडेजा सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. त्याचे झेल घेण्याचे कौशल्य तसेच अफलातून थ्रो करत फलंदाजाला धावचीत करण्याची क्षमता याचे नेहमीच कौतुक होत असते. त्याच्या हातून झेल निसटल्याचे क्वचितच पाहायला मिळते. अशा वेगवेगळ्या क्षणी लोकांच्या आलेल्या प्रतिक्रियांबद्दल जडेजाने भाष्य केले आहे.
त्याने म्हटले आहे की जेव्हा त्याच्या मेहनचीचे कौतुक होते, तेव्हा त्याला छान वाटते. तसेच जेव्हा चूक झाल्यानंतरही लोक समजून घेतात, असेही जडेजाने सांगितले आहे.
रवींद्र जडेजानी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ‘मला माहिती आहे की, सामन्यात चेंडूपर्यंत पोहोचण्याची माझ्या गतीची शैली उत्तम आहे. मला नाही माहिती की, बाकीचे खेळाडू चेंडूपर्यंत पोहचण्याअगोदर कोणता विचार करतात. परंतु सामान्यतः मला इतक्या दिवस खेळण्याचा अनुभव आहे. त्यावरून मला माहिती आहे की, कोणता खेळाडू कोणत्या प्रकारचा शॉर्ट खेळू शकतो. मी हे नाही सांगू शकत की, तो कुठे शॉर्ट मारेल आणि चेंडू कुठे जाईल. पण माझ्याकडे एक जास्तीचा सेकंद असतो, त्यामध्ये मी चेंडूपर्यंत वेगाने धावतो.’
तो पुढे असं म्हणाला की, ‘यामुळेच तुम्ही मला क्षेत्ररक्षण करताना पाहता तेव्हा सगळे सोपे वाटते आणि बाकीचे झेल पकडण्यासाठी उशिरा हालचाल करतात त्यामुळे ते कमालीचे झेल पकडतात असे वाटते.’
जडेजा म्हणाला की, ‘ मला खूप छान वाटत जेव्हा लोक माझे कौतुक करतात. जरी त्यांना माझी मेहनत दिसली नाही तरी ही त्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे. जर चुकून मी झेल सोडला तरी ते मला वाईट बोलत नाहीत. परंतु ‘असा झाला असता तर’ असे म्हणतात.’
चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना रवींद्र जडेजाने आयपीएल 2021 मध्ये 8 झेल पकडले. आयपीएलच्या इतिहासात जडेजा सर्वाधिक धावबाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वरच्या क्रमाकावर आहे. त्याने आत्तापर्यंत 24 वेळा फलंदाजाला धावबाद केले आहे.
जडेजा देतो खांद्याच्या व्यायामावर भर
रवींद्र जडेजाला त्याच्या क्षमतेबद्दल विचारल्यानंतर त्याने सांगितले की, हे मला माझ्या वडिलांकडून अनुवंशिकतेने आणि त्याच्या परिश्रमाने मिळाले आहे. तसेत त्याने सांगितले की जास्त मेहनत केली नसती तर खांद्यानी कधीच हार मानली असती. जडेजाने त्याच्या मेहनतीचं श्रेय त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक महेंद्रसिंह चौहान यांनाही दिले.
जडेजा म्हणाला की, ‘माझ्या या शैलीबद्दल तुम्ही खरंतर माझ्या वडिलांना विचारायला पाहिजे. माझ्यामध्ये त्यांचेच जनुके आहेत. काही नैसर्गिक आहेत. तर काहीसाठी मला अथक परिश्रम घ्यावे लागलेत. मी खांद्याचा व्यायाम, जिम, सराव केला. सर्व काही नैसर्गिक नव्हते. मी माझ्या खांद्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. नाहीतर त्यांनी आतापर्यंत हार मानली असती. बारा-तेरा वर्षे झाली मी माझ्या खांद्याला सांभाळून ठेवले आहे.’
पुढे तो म्हणाला की, ‘मी खांद्याचा उत्तम सराव करतो आणि काळजीही घेतो. जामनगरमधील माझे प्रशिक्षक महेंद्रसिंह चव्हाण हे मला नेहमी म्हणायचे की, अगोदर पळ आणि क्षेत्ररक्षण कर. त्याच्यानंतरच तुला फलंदाजी करायला मिळेल. सुरुवातीचे चार वर्ष माझ्या क्षेत्ररक्षणावर मी जास्त मेहनत घेतली. माझे प्रशिक्षक कठोर दिसायचे. कधीच त्यांनी आमच्यावर दयेचा भाव दाखवला नाही. परंतु, ते खूप प्रेमळ होते.’
रवींद्र जडेजा येत्या विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकतो. हा सामना साऊथॅम्पटनला 18 ते 22 जूनदरम्यान न्यूझीलंडविरुद्ध रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वेलकम होम डॅडी! वॉर्नरच्या लाडक्या लेकींनी जवळपास २ महिन्यांनी भेटलेल्या ‘बाबा’चे केले खास स्वागत
” जास्त हिरो बनू नकोस”, नवदीप सैनीने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी केले ट्रोल
‘माझे हेडफोन्स कुठे आहेत?’, अनुष्काने विचारलेल्या प्रश्नावर विराटने दिले भन्नाट प्रत्युत्तर