भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेचा तिसरा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या वेळी भारतासाठी सामन्याचा दुसरा दिवस गाजवला तो रवींद्र जडेजाने. जडेजाने गोलंदाजीत व क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी करत भारतीय संघाला सामन्यात आघाडीवर आणले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जडेजाने आपल्या गोलंदाजीचे गुपित उलगडले आहे.
पत्रकारांशी बोलताना जडेजा म्हणाला की, “खेळपट्टीतून काहीही मदत मिळत नव्हती. परंतु तरीही मी विकेट घेण्यात यश मिळविले कारण मी केवळ चेंडूची गतीच बदलली नाही तर वेगवेगळ्या कोनातून देखील गोलंदाजी केली.”
जडेजा आपल्या रणनिती बद्दल बोलताना म्हणाला, “ऑस्ट्रेलियाने आमच्यावर दबाव आणण्यापूर्वी आम्हीच त्यांच्यावर दबाव आणणे गरजेचे होते. प्रत्येक षटकात विकेट घेण्याची संधी मिळेल अशी ही खेळपट्टी नव्हती. या खेळपट्टीवर कोणतीही मदत नाही. म्हणूनच मला कायम चेंडूची गती बदलत रहावी लागली.”
जडेजाने या सामन्यात 18 षटकात 62 धावा देत 4 बळी मिळवले आहेत. गोलंदाजीत उत्तम कामगिरी सोबतच जडेजाने क्षेत्ररक्षणातही कमाल केली. जडेजाने एका अविश्वसनीय थ्रोवर स्टीव स्मिथला धावबाद केले. भारतीय संघाला जडेजाकडून फलंदाजीतही उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण झाला असून भारताने 2 गडी गमावत 96 धावा केलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 338 धावांपासून अजूनही ते 242 धावांनी पिछाडीवर आहेत.
महत्वाच्या बातम्या:
पुजाराची संथ फलंदाजी आणि प्रेक्षकाने भर मैदानातच घेतली डुलकी!
ऑलिंपिकमध्ये व्हावा टी-१० क्रिकेटचा समावेश, स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची मागणी
आयडियाची कल्पना! लॅब्यूशानेने बॅटची ग्रीप बसवताना हँडेलवर फुंकर घातल्याचं हे होतं कारण