2019 लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय पातळीवरील घडामोडींना वेग आला आहे. त्यातच शनिवारी (2 मार्च) भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने भारतीय जनता पक्षात(भाजप) प्रवेश केला आहे.
रिवाबाने जामनगरमध्ये गुजरातचे कृषीमंत्री आरसी फालदू आणि संसद सदस्य पूनम मदाम यांच्या उपस्थीतीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी तिचे भाजपच्या मंत्र्यांनी पक्षात स्वागत केले आहे.
#Jamnagar: Rivaba Jadeja, wife of cricketer Ravindra Jadeja joined #BJP in presence of Gujarat Agriculture Minister R C Faldu and MP Poonam Madam earlier today. #Gujarat pic.twitter.com/hZvm2MLy2e
— Rahul Singh Rajawat (@RahulSi90179878) March 3, 2019
याआधी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये रिवाबाने राजपूत करणी सेनाच्या गुजरातमधील महिला विंगचे अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली होती. त्यावेळी तिने सांगितले होते की ही सुरुवात असून तिला कम्यूनिटीसाठी चांगले काम करायचे आहे.
तसेच मागीलवर्षी रविंद्र जडेजा आणि रिवाबाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची ही भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ट्विटही केले होते. तसेच रविंद्र जडेजानेही मोदींबरोबरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
Had a wonderful interaction with noted cricket player Ravindrasinh Jadeja and his wife, Rivaba. @imjadeja pic.twitter.com/Yrn4XOdPaz
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2018
Proud moment to meet our Honourable Prime Minister shri Narendra Modi saheb.#greatpersonality @narendramodi pic.twitter.com/ZiFIZdM6HF
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 20, 2018
रिवाबाही मॅकेनिकल इंजिनियर आहे. तिचा आणि रविंद्र जडेजाचा 17 एप्रिल 2016 ला विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी जे काही करायला सांगतो ते मी डोळे झाकून करतो – केदार जाधव
–विराट, शमीने एकमेकांना दिली नवीन टोपन नावे, वाचा
–भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या केदार-धोनी जोडीने केला हा मोठा पराक्रम