आगामी आयपीएल (IPL) 2025 पूर्वी मेगा लिलाव (Mega Auction) आयोजित केला जाणार आहे. याआधी, संघ कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ गेल्या हंगामात चमकदार कामगिरी करुन प्लेऑफमध्ये पोहोचला होता. त्यामध्ये विराट कोहलीबरोबरच फाफ डू प्लेसिसनं देखील चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे दोघंही संघात कायम राहू शकतात, तर ग्रीनला देखील आरसीबी संघात कायम ठेवण्याचा प्रयत्न करु शकते.
भारतानं टी20 विश्वचषक जिंकल्यावर कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती घेतली. पण तरीही तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. कोहलीनं गेल्या हंगामात 15 सामन्यात 741 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यानं 1 शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली होती. कोहलीला आरसीबी कायम ठेवणार हे जवळपास निश्चित आहे. कारण कोहली 17 वर्ष त्याच संघाचा भाग आहे आणि त्याच्यमुळे लोक देखील आरसीबीचे चाहते आहेत. कोहलीनं आयपीएलच्या 252 सामन्यांमध्ये 8,004 धावा केल्या आहेत. कोहलीनं आयपीएलमध्ये 8 शतकं आणि 55 अर्धशतकं ठोकली आहेत.
डु प्लेसिस हा आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीनं गेल्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं होतं. डुप्लेसिसनं फलंदाजीतही प्रावीण्य दाखवलं. त्यामुळे त्याला यावेळी आरसीबी कायम ठेवू शकते. डुप्लेसिसनं गेल्या हंगामात 15 सामन्यात 438 धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्यानं 4 अर्धशतकं झळकावली होती.
कॅमरन ग्रीन हा स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. गेल्या हंगामात त्यानं धावा करण्यासोबतच विकेट्सही घेतल्या. ग्रीननं 13 सामन्यात 255 धावा केल्या होत्या. यासोबतच त्यानं 10 विकेट्सही घेतल्या. तो मधल्या फळीत किंवा लोअर मिडल ऑर्डरमध्ये आरसीबीसाठी फलंदाजीला येतो. ग्रीननेही काही सामन्यांमध्ये संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामापूर्वी आरसीबी ग्रीनला संघात कायम ठेवू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
“उसेन बोल्टवर बंदी…” ऑलिम्पिकच्या लिंग वादावर बाॅलिवूड अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य!
ऍशेस की बॉर्डर-गावस्कर, कोणती मालिका मोठी? कांगारू गोलंदाजाने दिले आश्चर्यकारक उत्तर
भारत-पाकिस्तान यांच्यात 18 वर्षांनंतर होणार कसोटी सामना! जाणून घ्या संपूर्ण समीकरण