IPLक्रिकेटटॉप बातम्या

सततच्या पराभवानंतर आरसीबीचे खेळाडू देवाच्या शरणी, मुंबईच्या सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन

आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची निराशाजनक कामगिरी जारी आहे. आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील टीमला केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे. सध्या आरसीबी गुणतालिकेत 2 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. याशिवाय संघाचा नेट रन रेटही फार खराब आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आरसीबीचे खेळाडू देवाच्या शरणी गेले आहेत. आरसीबीचे महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, वैशाख विजयकुमार आणि सुयश प्रभुदेसाई मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहचले. या चौघांनी सिद्धिविनायक मंदिरात पूजा-अर्चना केली. सोशल मीडियावर त्यांचा सिद्धिविनायक मंदिरातील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. युजर्स यावर सातत्यानं कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत.

येत्या गुरुवारी (11 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स यांच्यात लढत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. विशष म्हणजे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या देखील सलग तीन पराभवानंतर सोमनाथाच्या दर्शनाला गेला होता. त्यानंतर चौथ्या सामन्यात मुंबईनं दिल्लीवर आयपीएल 2024 मधील विजय मिळवला. आता आरसीबीचे खेळाडू सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेल्यानंतर संघाच्या कामगिरीत काही फरक पडतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

आरसीबीची या हंगामातील कामगिरी निराशाजनक राहिली असली तरी, विराट कोहली तुफान मात्र फार्मात आहे. त्यानं राजस्थान रॉयल्सविरुद्ध 72 चेंडूत नाबाद 113 धावांची शानदार खेळी खेळली होती. मात्र गोलंदाजांनी निराशा केल्यानं संघाला 6 गडी राखून पराभव पत्कारावा लागला.

विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही सर्वात पुढे आहे. त्यानं चालू हंगामात 5 सामन्यांमध्ये 105.33 च्या सरासरीनं 316 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. या यादीत विराट कोहलीनंतर गुजरात टायटन्सचा युवा फलंदाज साई सुदर्शनचा क्रमांक लागतो. त्यानं 5 सामन्यांमध्ये 38.20 च्या सरासरीनं 191 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवची दुखापत किती गंभीर? पुढचे सामने खेळणार की नाही? जाणून घ्या अपडेट

एका षटकात 10 धावा वाचवायच्या असतील तर नसीम शाह आणि बुमराहपैकी कोणाची निवड करणार? बाबर आझमच्या उत्तरानं खळबळ!

आयपीएल 2024 मध्ये एका सामन्यात 5 बळी घेणारा पहिला गोलंदाज, जाणून घ्या कोण आहे विदर्भाचा यश ठाकूर?

Related Articles