---Advertisement---

‘भारतात मिताली राज हे नाव महिला क्रिकेटसाठी समानार्थी’, निवृत्तीनंतर दिग्गजांकडून मितालीवर शुभेच्छांचा पाऊस

Mithali-Raj
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू मिताली राज हिने आज आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. अगदी अचानकपणे मितालीने एक ट्वीट करत आपण क्रिकेटमधून सन्यास घेत असल्याचे जाहिर केले. तिच्या या घोषणेनंतर क्रिकेट जगतातून प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी असणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या ट्विटर अकाऊंटवरून मितालीला (Mithali Raj) भावी वाटचालीस शुभेच्छा देणारे ट्वीट करण्यात आले. “तुझा खेळ पाहणे ही एक गौरवाची गोष्ट होती, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा” असा संदेश लिहून मुंबईच्या ट्विटर अकाऊंटवरून मितालीचे आभार मानत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

बीसीसीआय वुमेनच्या (BCCI Women) ट्विटर अकाऊंटवरून देखील एक ट्वीट प्रसारित करण्यात आले आहे. या ट्वीट मध्ये “कर्णधार, दिग्गज आणि प्रेरणास्थान, खेळासाठी तू दिलेले योगदान सदैव लक्षात राहिल, भावी वाटचालीस शुभेच्छा,” असा संदेश मितालीला देण्यात आला आहे.

यानंतर बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी देखील ट्वीट करत मितालीचे आभार मानले आहेत. “एका अद्भुत कारकीर्दीचा अंत झाला आहे! भारतीय क्रिकेटमधील तुझ्या अतुलनीय योगदानाबद्दलआणि मैदानावरील तुझ्या नेतृत्वामुळे राष्ट्रीय महिला संघाला गौरव प्राप्त झाला आहे. मैदानावरील या शानदार खेळीबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!” असा संदेश या ट्वीटमध्ये देण्यात आला आहे.

त्यानंतर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी देखील ट्वीट करत मितालीचे कौतुक केले आहे. “भारतासाठी खेळणे हे एक स्वप्न आहे जे फार कमी लोक पूर्ण करतात आणि २३ वर्षे राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम असणे हे आश्चर्यकारक आहे. तू भारतातील महिला क्रिकेटचे आधारस्तंभ आहेस आणि अनेक तरुण मुलींच्या आयुष्याला आकार दिला आहे. तुझ्या अभूतपूर्व कारकिर्दीसाठी खूप खूप अभिनंदन” असे लिहीत लक्ष्मण यांनी मितालीचे कौतुक केले आहे.

नुकतेच भारतीय संघात पुनरागमन केलेल्या यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) देखील मितालीचे आभार मानले आहेत. “भारतात मिताली राज हे नाव महिला क्रिकेटसाठी समानार्थी आहे. तुम्ही जगभरातील लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहात. तुमच्या भावी प्रयत्नांसाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा” असे म्हणत कार्तिकने मितालीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

https://twitter.com/DineshKarthik/status/1534477101092548608?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1534477101092548608%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fcricket%2Fbouncer-mithali-raj-retirement-cricket-fraternity-react-on-mithali-raj-retirement-including-vvv-laxman-22784311.html

दरम्यान, मितालीने निवृत्ती जाहिर केल्यानंतर भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रित कौरच्या खांद्यावर आली आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यापासून हरमनप्रित भारतीय संघाचे नेतृत्व करेल, अशी माहिती बीसीसीआय वुमन तर्फे प्रसारित करण्यात आली आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पुणेरी वॉरियर्स, एएफए सॅमफोर्ड, भारती एफसी उपांत्यपूर्व फेरीत

आयुष्यात खडतर प्रवास करणाऱ्या पठ्ठ्याला ‘दादा’ने दिली साथ, आज तोच ठरलाय शतकवीर

टीम इंडियाला मोठा झटका! राहुलसह ‘हा’ खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर, नेतृत्व कुणाकडे?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---