---Advertisement---

फक्त माजी खेळाडूच दिसणार समालोचन करताना, भोगलेंसह अनेक दिग्गजांना घरचा रस्ता?

---Advertisement---

मुंबई | आंतरराष्ट्रीय सामन्यांत समालोचकाच्या भुमिकेसाठी फक्त माजी क्रिकेटपटूनांच संधी देण्याच्या विचार बीसीसीआय करत आहे. सध्या चालू असलेल्या भारत आणि विंडिज यांच्यातील कसोटी मालिकेसाठीही फक्त माजी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

त्यामध्ये सुनिल गावसकर, संजय मांजरेकर, एल शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक आणि दीपदास गुप्ता यांचा समावेश आहे. इयान बिशाॅप आणि डॅरेन गंगा हे विंडिजचे माजी दिग्गज खेळाडूही या मालिकेत समालोचन करताना दिसत आहेत.

हिंदीत समालोचन करण्यासाठी मोहम्मद कैफ, आरपी सिंग, अशोक मल्होत्रा, विवेक राजदान, अतुल वासन आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची निवड करण्यात आली आहे.

या मालिकेसाठी समालोचकांमध्ये हर्षा भोगलेंचा समावेश करण्यात आलेला नाही. गेल्याच महिन्यात झालेल्या भारत आणि इंग्लड यांच्यातील मालिकेसाठी हर्षा भोगले यांचा समालोचकांमध्ये समावेश होता.

आशिया कपपाठोपाठ विंडीज मालिकेतही भोगलेंना समालोचन म्हणुन संधी देण्यात आली नाही. यामुळे बीसीसीआय यापुढे केवळ माजी खेळाडूंनाच समालोचनाची संधी देणार असल्याचे एका रिपोर्टमधून बाहेर आले आहे.

हर्षा भागलेंचे बीसीसीआयबरोबर फारसे चांगले संबध नाही. त्यांना टी-20 विश्वचषक 2016नंतर फक्त या वर्षीच्या आयपीएलमध्येच समालोचण्याची संधी देण्यात आली होती. यावर विचारले असताना ‘आपण सध्या विश्रांती घेत आहोत’, असे म्हणत भोगले यांनी भाष्य करणं टाळलं.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment