चिपळूण। ६७ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला कालपासून चिपळूण येथे सुरू झाली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे.
काल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिला गटात रत्नागिरी विरुद्ध परभणी व पुणे विरुद्ध सांगली तर पुरुष गटात पुणे विरुद्ध उस्मानाबाद, कोल्हापूर विरुद्ध परभणी, रायगड विरुद्ध नाशिक व रत्नागिरी विरुद्ध पालघर या सामन्यांनी उद्घाटन झाले.
महिला ‘क’ गटात यजमान रत्नागिरीने ७२-१९ असा एकतर्फी विजय मिळवला. तर ‘अ’ गटात पुणे संघाने सांगलीचा ५४-१७ असा पराभव केला. महिलांच्या तिसऱ्या सामन्यांत धक्कादायक निकाल बघायला मिळाला. मुंबई उपनगर महिला संघावर औरंगाबाद संघाने २५-२४ असा विजय मिळवला. मुंबई शहरने ५४-२१ असा बीडवर विजय मिळवला.
पुरुष विभागातही सर्व सामने एकतर्फी झाले. पुणे संघाने ६९-१२ असा उस्मानाबाद संघाला नमवले. तर कोल्हापूर संघाने ५०-२५ असा परभणी संघावर विजय मिळवला. रायगड विरुद्ध नाशिक चांगली लढत बघायला मिळाली. चुरशीच्या लढतीत रायगड संघाने ३१-२७ असा विजय मिळवला. तर यजमान रत्नागिरीने पालघर संघावर ३१-१४ असा विजय मिळवत विजयी सुरवात केली.
पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी सकाळ सत्र असे मिळवून आतापर्यत महिलांचे ०८ तर पुरुषांचे २५ सामने झाले आहेत. आज संध्याकाळ सत्रात सर्व साखळी सामने पार पडणार आहेत.
संक्षिप्त निकाल पहिला दिवस महिला विभाग:
१) रत्नागिरी ७२ – परभणी १९ (क)
२) पूणे ५४ – सांगली १७ (अ)
३) मुंबई उपनगर २४ – औरंगाबाद २५ (ब)
४) पालघर ५४ – जालना २३ (ड)
५) कोल्हापूर ४९ – धुळे २२ (इ)
६) मुंबई शहर ५४ – बीड २१ (फ)
७) ठाणे ५२ – सोलापूर ३९ (इ)
८) नाशिक ४१ – जळगाव १५ (फ)
दिवस पहिला पुरुष विभाग:
१) पुणे ६९ – उस्मानाबाद १२ (फ)
२) कोल्हापूर ५० – परभणी २५ (फ)
३) रायगड ३१ – नाशिक २७ (अ)
४) रत्नागिरी ३१ – पालघर १४ (क)
५) सांगली ५१ – सोलापूर १३ (ब)
६) ठाणे ५७ – हिंगोली २४ (अ)
७) धुळे ४१ – लातूर ३१ (ब)
८) अहमदनगर ४४ – नांदेड ०७ (क)
९) मुंबई शहर ५४ – जालना १३ (ड)
१०) बीड ४१ – सिंधुदुर्ग २२ (ड)
११) मुंबई उपनगर ३८ – जळगाव १५ (इ)
१२) नंदुरबार ५१ – सातारा ३८ (इ)
१३) पुणे ४७ – परभणी ११ (फ)
१४) कोल्हापूर ४१ – औरंगाबाद ११ (फ)
१५) रायगड ५१ – हिंगोली १३ (अ)
१६) ठाणे ४८ – नाशिक २१ (अ)
दुसरा दिवस सकाळ सत्र पुरुष संघ:
१७) सांगली ५१ – लातूर १३ (ब)
१८) धुळे ४७ – सोलापूर १५ (ब)
१९) रत्नागिरी ४७ – नांदेड ०५ (क)
२०) अहमदनगर ४६ – पालघर ४६ (क)
२१) मुंबई शहर ४५ – सिंधुदुर्ग १० (ड)
२२) बीड ४१ – जालना २३ (ड)
२३) मुंबई उपनगर ५५ – सातारा १४ (इ)
२४) नंदुरबार ३८ – जळगाव ३० (इ)
६७व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचे संघ जाहीरhttps://t.co/20ZPyZRexm
— Maha Sports (@Maha_Sports) December 16, 2019
६७व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेची गटवारी जाहीर
वाचा- 👉https://t.co/b3QKtaEiXw👈#म #मराठी #Kabaddi @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 16, 2019