---Advertisement---

पराभवानंतर रूटचा ऊहापोह; म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी रिव्हर्स स्विंगने आमचा घात केला’

Joe Root
---Advertisement---

चौथ्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी (०६ सप्टेंबर) इंग्लंडला १५७ धावांनी पराभूत करून भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. दुपारच्या जेवणानंतर बुमराहने ओली पोप (२) आणि जॉनी बेअरस्टो (०) ला त्रिफळाचीत केले आणि सामना भारताच्या बाजूने झुकला. अगदी इंग्लंडचा कर्णधार जो रूटही म्हणाला की, बुमराहच्या त्या स्पेलमुळे सामन्याचा कल बदलला.

बुमराहने जानेवारी २०१८ मध्ये केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि तेव्हापासून तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना त्याने म्हटले की, ‘भारताला त्यांचे विजयाचे श्रेय दिले पाहिजे, ते चेंडूला रिव्हर्स स्विंग करू शकले आणि तिथेच सामना भारताच्या बाजूने झुकण्यास सुरुवात झाली. माझ्या मते बुमराहचा स्पेल हा सामन्याचा टर्निंग पाँईट ठरला.’

इंग्लिश कर्णधार जो रूट सामना संघाच्या पराभवानंतर म्हणाला की, ‘आजच्या सामन्यातून काहीही हाती न लागणे हे निराशाजनक होते. आम्हाला वाटले की, आम्हाला जिंकण्याची संधी आहे. आम्ही पहिल्या डावात अधिक आघाडी घेऊ शकलो असतो आणि तुम्हाला जागतिक दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध खेळतांना अशा संधी शोधाव्या लागतात.’

जसप्रीत बुमराहने त्याच्या २४ व्या कसोटीत १०० विकेट्स घेत भारताचे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांना मागे टाकले आहे. कपिल देव यांनी १९८० मध्ये त्यांच्या २५ व्या कसोटीत ही कामगिरी केली. बुमराहने ऑली पोपला (०२) त्रिफळाचीत करत १०० कसोटी बळींचा टप्पा गाठला आहे.

रोहित शर्मा ठरला सामानावीर
भारताच्या दुसऱ्या डावात १२७ धावा करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. परदेशात खेळल्या गेलेल्या कसोटींमध्ये रोहितचे हे पहिलेच शतक आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित म्हणाला, ‘मला मैदानावर टिकून खेळायचे होते. हे शतक झळकावणे माझ्यासाठी खास होते. दुसऱ्या डावात मोठ्या धावसंख्येचे महत्त्व आम्हाला माहीत होते. परदेशी खेळपट्टीवर हे माझे पहिले शतक आहे. तीन अंकी धावसंख्येचा मी विचार करत नव्हतो. आम्हाला बढत मिळाल्यानंतर इंग्लिश संघाला दबावाखाली आणण्याचा आमचा प्रयत्न होता.’

महत्त्वाच्या बातम्या-

‘बुमराह संघात असल्यास कोणाला अश्विनची गरज भासेल’, इंग्लंडच्या माजी क्रिकेटरचे लक्षवेधी विधान

‘विराटसेने’च्या ऐतिहासिक विजयानंतर एबीचे भन्नाट ट्वीट, टीकाकारांची बसली असेल ‘दातखिळी’!

एक नंबर विकेट! मयंकचा ‘रॉकेट थ्रो’ अन् रिषभची चपळता, इंग्लंडचा मोठा फलंदाज दुर्देवीरित्या धावबाद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---