भारतीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाचे समानार्थी नाव म्हणून माजी कर्णधार एमएस धोनीचे नाव घेतले जाते. यष्टीरक्षण करण्याची धोनीची स्वतःची शैली आहे. अनेक जण त्याला यष्टीरक्षणाची शाळा असे देखील संबोधतात. त्याची यष्टीरक्षणाची पद्धत क्रिकेटच्या पुस्तकाबाहेरील आहे. मात्र, भारताच्या महिला क्रिकेट संघाची युवा यष्टीरक्षक रिचा घोष हिची शैली देखील चपळाईच्या बाबतीत धोनीशी मिळतीजुळती आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात तिची हिच चपळाई पाहायला मिळाली. हा सामना भारत गमावला परंतु, भारतीय खेळाडूंनी केलेल्या काही करामती या सामन्यातील ठळक घटना ठरल्या. त्यापैकीच एक रिचा घोष हिचे यष्टीरक्षण होय.
रिचा घोष हिचे अफलातून यष्टिरक्षण
वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या डावातील एकोणिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भारतीय अष्टपैलू हरलीन देओलने नतालिया सिवर हिचा एक नेत्रदीपक झेल टिपला. त्या झेलाचे दृश्य डोळ्यासमोरून जात नाही तोपर्यंतच पुढच्या चेंडूवर देखील अशीच एक अफलातून घटना घडली.
याच षटकातील अखेरच्या चेंडूवर इंग्लंडची सोफी डंकली फलंदाजी करत होती. वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत असली तरी, भारताची युवा यष्टीरक्षक रिचा घोष ही यष्ट्यांजवळ येऊन उभी राहिली. डंकली त्या चेंडूवर चकल्यानंतर रिचा घोष हिने डोळ्याची पापणी लवेपर्यंत चेंडू झेलत बेल्स उडवल्या. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली असता, रिचा घोष हिने विजेच्या वेगाने यष्टिचीत केल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Briliant stumping richa ghosh ❤ pic.twitter.com/x8qA7QgxMV
— Jojin (@Jojin29454213) July 9, 2021
अशी राहिली आहे कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करणारी १७ वर्षीय रिचा आतापर्यंत भारतासाठी केवळ सात टी२० सामने खेळली आहे. चापल्ययुक्त यष्टीरक्षण व आक्रमक फटकेबाजी यासाठी ती ओळखली जाते. इंग्लंड दौऱ्यावर एकमेव कसोटी व वनडे मालिकेत तानिया भाटियाने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळल्यानंतर टी२० सामन्यात रिचाला संधी देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय वेगवान गोलंदाजाची अचानक निवृत्ती, घेतले आहेत ४७२ बळी
धोनीच्या ‘त्या’ बॅटवर लागली होती कोटींची बोली, गिनीज बुकमध्ये आहे नोंद