पुणे, 10 नोव्हेंबर 2023: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित 19व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर ऋचा पुजारी, सुयोग वाघ, विक्रमादित्य कुलकर्णी, कशिश जैन, ऋत्विक कृष्णन या खेळाडूंनी 5 गुणांसह संयुक्तरित्या आघाडी प्राप्त केली.
गणेश सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे आजपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर ऋचा पुजारी हिने मोहम्मद शेखचा पराभव 5 गुण मिळवले. सुयोग वाघने अक्षय बोरगावकरचा तर, विक्रमादित्य कुलकर्णीने निर्गुण, केवलचा पराभव करून 5 गुंणाची कमाई केली. कशिश जैनने हर्ष घाडगेचा पराभव करून 5 गुण प्राप्त केले.
स्पर्धेचे उद्घाटन एमसीएचे मानद सचिव निरंजन गोडबोले, पीडीसीसीचे उपाध्यक्ष अश्र्विन त्रिमल आणि पीडीसीसीचे सदस्य संजय आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, कुंटे चेस अकादमीच्या संचालिका मृणालिनी कुंटे, आयए राजेंद्र शिदोरे, आयए विनिता श्रोत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: पाचवी फेरी(व्हाईट व ब्लॅक या नुसार):
मोहम्मद, नुबैरशाह शेख (4 गुण)पराभुत वि.ऋचा पुजारी(5 गुण);
अंजनेय फाटक(4.5गुण)बरोबरी वि.लक्ष्मण, आर.आर.(4.5गुण);
सुयोग वाघ (5 गुण)वि.वि.अक्षय बोरगावकर (4गुण);
विक्रमादित्य कुलकर्णी (5 गुण)वि.वि.निर्गुण, केवल (4गुण);
कशिश जैन (5गुण)वि.वि.हर्ष घाडगे (4 गुण);
राम परब (4गुण)पराभुत वि.ऋत्विक कृष्णन (5गुण);
अर्णव खर्डेकर (3.5गुण)पराभुत वि.राहुल व्ही एस(4.5गुण);
कुशाग्र मोहन (4.5 गुण)वि.वि.आहान, शर्मा (3.5 गुण);
यश वाटरकर (3.5गुण)पराभुत वि.निखिल दीक्षित(4.5गुण);
अक्षय जोगळेकर (3.5 गुण)पराभुत वि.अभिषेक, केळकर (4.5 गुण);
वेदांत नगरकट्टे (4गुण)बरोबरी वि.धनश्री खैरमोडे (4गुण);
सम्मेद शेटे (4गुण)वि.वि.आशिष चौधरी(3.5गुण);
पद्मिनी राउत(4गुण)वि.वि.अपूर्व देशमुख(3गुण);
आरुष डोळस(4गुण)वि.वि.वीरेश शर्नार्थी(3गुण);
महत्वाच्या बातम्या –
पप्पु हळदणकर स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पृथा वर्टीकर हिला विजेतेपद
सिकंदर शेख बनला नवा महाराष्ट्र केसरी! अवघ्या साडेपाच सेकंदात शिवराज राक्षेवर मात