भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील तिसर्या सामन्याला ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याच्या तिसर्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियन संघाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाच्या ३३८ धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना भारताचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघाडी मिळाली.
दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाने २ बाद १०३ धावांची मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण १९७ धावांची आघाडी आहे. एकूण सामन्याचा विचार करता भारतीय संघ नक्कीच बॅकफूटवर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने यासाठी भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला जबाबदार धरले आहे.
पुजाराच्या संथ फलंदाजीवर टीका
चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात फलंदाजी करताना १७६ चेंडूत ५० धावा काढल्या. या खेळी दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट अवघा २८.४१ होता. पुजाराच्या या संथ फलंदाजीवर एका चाहत्याने पॉन्टिंगला ट्विटरवर प्रश्न विचारला. या चाहत्याने लिहिले, “पुजाराच्या फलंदाजीकडे तुम्ही कसे पाहता? १६ धावा करण्यासाठी १०० चेंडू खर्च करणे, तेही फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर. ही योग्य पद्धत आहे असे तुम्हाला वाटते का?”
यावर उत्तर देतांना पॉन्टिंग म्हणाला, “माझ्या मते हे अतिशय अयोग्य आहे. पुजाराला धावा काढण्याच्या गती मध्ये अजून सक्रियता दाखवणे गरजेचे आहे. कारण त्याच्या या दृष्टिकोनाने इतर फलंदाजांवर दबाव वाढतो आहे.
I don't think it was the right approach, I think he needed to be a bit more proactive with his scoring rate because I felt it was putting too much pressure on his batting partners https://t.co/2OhmdATvke
— Ricky Ponting AO (@RickyPonting) January 9, 2021
पुजाराच्या संथ फलंदाजीवर या मालिकेत बरीच टीका झाली आहे. अनेक माजी खेळाडूंनी त्याने दृष्टिकोनात सकारात्मकता आणायला हवी, असे सुचवले आहे. भारतीय संघाला सिडनी कसोटी जिंकायची असल्यास किंवा अनिर्णित राखायची असल्यास पुजाराला दुसर्या डावात मोठी खेळी साकारावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आँखों आँखों में ! जडेजा-हेजलवूडचा नजर रोखून पाहण्याचा फोटो व्हायरल, चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
खरं की काय? रिषभ पंतने ‘या’ रेकाॅर्डमध्ये सर विवियन रिचर्ड्स यांनाही मागे टाकलंय; वाचा पराक्रम
कॉमेंट्री करतेवेळी शेन वॉर्नने दिली मार्नस लॅब्यूशानेला शिवी अन् पुढे घडलं असं काही