भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू आहे. यावेळी भारतीय फलंदाज रिषभ पंतने 36 धावांची आक्रमक खेळी करत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.
पंतने भारताच्या पहिल्या डावात 67 चेंडूचा सामना करत 4 चौकारांसह आक्रमक 36 धावांची खेळी केली. त्यामुळे रिषभ पंत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत सर्वाधिक वेळा सलग डावात 25 पेक्षा जास्त धावांची करणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. रिषभ पंतने सलग 9 डावांत 25 किंवा पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे.
पंतपूर्वी वॉल्टर हॅमंड, रवी सुरती आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांनी प्रत्येकी 8 वेळा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेट खेळताना अशी कामगिरी केली होती.
पंतने ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या 9 डावात अनुक्रमे 25, 28, 36, 30, 39, 33, 159*, 29, 36 अशा धावा केल्या आहेत.
पंत दुखापतग्रस्त –
सध्या सुरु असलेल्या सिडनी कसोटीत पंत या डावात मोठी खेळी उभारणार अशी आशा असतानाच पॅट कमिन्सचा एक चेंडू त्याच्या हाताला लागला व त्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर पंतची लय बिघडली व काहीवेळातच तो बाद झाला. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले.
दरम्यान सामन्याचा विचार केला असता ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावा केल्या. तर भारताचा पहिला डाव 244 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 94 धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात 29 षटकांत 2 बाद 103 धावांवर आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाने 197 धावांची आघाडी तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत वाढवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कॉमेंट्री करतेवेळी शेन वॉर्नने दिली मार्नस लॅब्यूशानेला शिवी अन् पुढे घडलं असं काही
लायसन्स तर नाय पण गाडी भारी चालवतंय! चिमुकल्याचा ‘हा’ व्हिडिओ सोशलवर हीट
…अन् पेन भाऊची सटकली! अंपायरशी हुज्जत घालत केली शिवीगाळ?