भारतीय कसोटी संघ सध्या मुंबईमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. यादरम्यान खेळाडू आपली तंदुरुस्ती राखण्यासाठी जिममध्ये घामही गाळत आहेत. दरम्यान, जिममध्ये व्यायामादरम्यानचा एक मजेशीर व्हिडिओ नुकताच भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. हा व्हिडिओ काहीवेळातच पंतच्या चाहत्यांकडून व्हायरल करण्यात आला.
पंतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की त्याने भारतीय संघाचा कामगिरी विश्लेषक हरिप्रसाद मोहन याला उचलून घेतले आणि गोल-गोल फिरवून खाली ठेवले. यातून पंतने त्याच्यात किती ताकद आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. या मजेशीर व्हिडिओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
From @RishabhPant17's Instagram pic.twitter.com/Sb7jsbwftW
— Zeeshan Kaskar (@TheOtherKaskar) May 28, 2021
रिषभ गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. खरंतर गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये खेळांडूंच्या फिटनेसला फार महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूच फिटनेसवर नेहमीच काम करताना दिसून येतात. पंतला त्याच्या मेहनतीचे फळ मिळतानाही दिसत आहे.
काहीदिवसांपूर्वी देखील पंतने जिममध्ये व्यायामादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या शरिराची लवचीकता दाखवली होती.
https://www.instagram.com/p/CPU1gfHCmwN/
पंत सध्या भारतीय संघासह मुंबईत क्वारंटाईन आहे. भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या एकूण ६ सामन्यांसाठी पंतची भारतीय संघात निवड झाली आहे.
पंत सध्या उत्तम फॉर्ममध्ये
रिषभने २०२०-२१ ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तीन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकांमध्येही दमदार प्रदर्शन केले. रिषभने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ कसोटी सामन्यात खेळताना ६८.५० च्या सरासरीने २७४ धावा केल्या होत्या. तो या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही ठरला होता.
त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात ४ कसोटी सामन्यात खेळताना रिषभने ५४ च्या सरासरीने २७० धावा केल्या होत्या. तो या मालिकेत जो रुट आणि रोहित शर्मानंतरचा सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता.
त्याने आयपीएल २०२१ मध्ये देखील स्पर्धा स्थगित होईपर्यंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना चांगली कामगिरी केली होती. पंतने या आयपीएल हंगामात ८ सामन्यात २ अर्धशतकांसह ३५.५० च्या सरासरीने २१३ धावा केल्या होत्या. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने ८ सामने खेळले होते. त्यातील ६ सामने जिंकण्यात त्यांना यश मिळाले, तर २ सामने ते पराभूत झाले. त्यामुळे १२ गुणांसह ते स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर होते.
महत्त्वाच्या बातम्या –
बक्कळ पैसा! पाकिस्तानच्या प्रशिक्षकापेक्षा पाच पट कमावतात शास्त्री, बघा इतर प्रशिक्षकांची पगार
त्रासदायक ठरत असलेल्या आफ्रिदीला अझरूद्दीनने दिला होता ‘हा’ सल्ला, पाहा व्हिडिओ
महाराष्ट्राच्या जाधवने साध्य केलं ‘सुयश’; टोकियो पॅरालिंपिकमध्ये क्वालियाय होत घडवला इतिहास