भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध खेळाडूंसोबत चाललेली स्लेजिंग सोशल मीडियावर कायमच वायरल होत असते. सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी देखील पंतचे एक नवे रूप बघायला मिळाले असून यावेळी तो गाणं गात असताना दिसला.
सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन व कॅमेरॉन ग्रीन फलंदाजी करत असताना पंत ‘स्पायडरमॅन’ हे गाणं म्हणत होता. स्टम्पमाइकमध्ये आलेल्या आवाजानुसार पंत ,” स्पायडर मॅन स्पायडर मॅन , तुने चुराया मेरे दिल का चैन.” हे वाक्य गात होता. पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, क्रिकेट फॅन्स देखील त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.
https://twitter.com/PawanSh10237254/status/1351082295084646402
https://twitter.com/Rajesh_Jsr7/status/1351093957833449474
Rishabh Pant behind stumps be like. #INDvsAUS #SpiderMan🎧 pic.twitter.com/7DFlOkwoEl
— stuti (aurora borealis) ☄️⭐ (@junkkDNA) January 18, 2021
https://twitter.com/afor_arryan/status/1351096826494148608
दरम्यान सामन्याचा विचार केला असता मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांवर आटोपला. सिराजने 73 धावा देत 5 बळी मिळवले. तिसऱ्या सत्रामध्ये पावसाचा व्यत्यय आल्याने भारताच्या दुसऱ्या डावातील केवळ 1.5 षटकेच पूर्ण होऊ शकली. भारताने या दरम्यान एकही बळी न गमावता 4 धावा केलेल्या आहेत. भारतासमोर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 33 धावांच्या आघाडीसह 328 धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारताला पाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी अजूनही 324 धावांची गरज असून रिषभ पंतकडून सिडनी कसोटी प्रमाणेच एका आक्रमक खेळीची अपेक्षा सर्व क्रिकेटप्रेमींना असणार आहे. पाचव्या दिवशी पावसाचा अंदाज असल्याने हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे की, भारतीय संघ विजयासाठी प्रयत्न करतो अथवा सामना अनिर्णित राखण्याकडे आपली वाटचाल करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
कौतुक तर होणारच! ब्रिस्बेन कसोटीत मोहम्मद सिराजचा ‘फाइव्ह विकेट हॉल’, भारतीय दिग्गजांनी केली प्रशंसा
रोहित शर्मा बनला ‘कॅच’ मास्टर; ब्रिस्बेन कसोटीत तब्बल ‘इतके’ झेल घेत केली दिग्गजाची बरोबरी
खरंच की काय! मुलीच्या जन्मामुळे विराटने ट्विटर बायोमधून हटवला ‘इंडियन क्रिकेटर’ शब्द ?