आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्या दरम्यान खेळला गेला. पंजाबच्या फलंदाजाने तुफानी फलंदाजी करत २२१ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात, राजस्थान रॉयल्सचा संघ हे भलेमोठे आव्हान पार करण्यास असमर्थ ठरला. पंजाबने आपल्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. मात्र, यादरम्यान राजस्थानचा अष्टपैलू रियान पराग याने टाकलेला एक चेंडू चर्चेचा विषय ठरला.
रियानचा केदार अवतार
पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारले होते. राजस्थानचा युवा कर्णधार संजू सॅमसन हा काहीसा द्विधा मनस्थितीत दिसला. सर्व प्रमुख गोलंदाज महागडे ठरत असताना, त्याने युवा अष्टपैलू रियान परागला दहाव्या षटकात गोलंदाजीसाठी उतरवले.
पहिल्या दोन चेंडूवर पाच धावा गेल्यानंतर षटकातील तिसरा चेंडू खेळण्यासाठी ख्रिस गेल आला. मात्र, रियान परागने अत्यंत विचित्र पद्धतीने आपल्या गोलंदाजी शैलीच्या विपरीत चेंडू टाकला. अशा प्रकारचे चेंडू टाकण्यासाठी भारताचा वरिष्ठ खेळाडू केदार जाधव ओळखला जातो. या चेंडूनंतर पंचांनी रियानला पुन्हा असा चेंडू न टाकण्याबाबत ताकीद दिली. विशेष म्हणजे, दोन चेंडूनंतर रियानने गेलला बेन स्टोक्सच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
That is right-arm perpendicular. What name can you think of for this unique action? #RRvPBKS #VIVOIPL pic.twitter.com/lTYuL6Xl4r
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2021
https://twitter.com/notkuhu/status/1381628075276857346
अश्विनने देखील टाकलेला असा चेंडू
आयपीएल २०२१ च्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने देखील अशाच प्रकारचा चेंडू टाकला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अनेक ऑफ स्पिनर अशा प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या –
कमाल! बेन स्टोक्सने घेतला धोकादायक ख्रिस गेलचा अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
मोईन अली-तस्लिमा नसरीन प्रकरणानंतर इंग्लिश खेळाडूंचे मोठे पाऊल, सोशल मीडियाचाच करणार बहिष्कार?
अरे व्वा! ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू इंग्लंडच्या ‘द हंड्रेड लीग’मध्ये करणार समालोचन