कोलकता। गुुरुवारी(26 एप्रिल) आयपीएल 2019 मधील 43 वा सामना इडन गार्डनवर कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्तान रॉयल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानने 3 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान राखले आहे.
या सामन्यात कोलकताने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून 17 वर्षीय रियान परागने 31 चेंडूत 47 धावांची सर्वोच्च खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. यातील एक चौकार रियानने हॅलिकॉप्टर शॉट खेळत मारला होता.
त्याच्या हॅलिकॉप्टर शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आयपीएलने अधिकृत वेबसाईटवरही तो व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा ‘हॅलिकॉप्टर शॉट’ हा ट्रेडमार्क शॉट आहे. त्यामुळे जेव्हाही क्रिकेटच्या मैदानात कोणताही फलंदाज हा शॉट खेळतो. त्यावेळी सर्वांना धोनीची आठवण होते.
रियान या सामन्यात 8व्या षटकात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर खेळायला आला होता. त्यानंतर त्याने 10 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर यारा पृथ्वीराजने फलंदाजी करणाऱ्या रियानला यॉर्कर चेंडू टाकला.
यावर रियानने शानदार हॅलिकॉप्टर शॉट मारला. या शॉटवर मारलेला चेंडू लाँग ऑन आणि डीप मिडविकेटच्या मधे पडून बाउंड्री लाईन पार करुन गेला.
रियानने सामना संपल्यानंतर त्याचा संघसहकारी वरुण ऍरॉनशी या शॉटबद्दल बोलताना सांगितले की त्याने या शॉटचा सराव केला नसून त्यावेळी तो सहजपण खेळला गेला.
रियान म्हणाला, ‘मी फक्त तो मारला. त्यामागे कोणती प्रेरणा नव्हती. मी माझ्या राज्याकडून खेळताना हा शॉट अनेकदा खेळलो आहे. मी शॉर्ट बॉलची वाट पाहत होतो पण त्याने(पृथ्वीराज) लेन्थ बॉल टाकला. त्यावर मी सहज शॉट खेळलो. मी कधीही याचा सराव केला नाही.’
या सामन्यात रियान 19 व्या षटकात स्वत:चीच बॅट स्टंम्पला लागल्याने बाद झाला. पण नंतर राजस्थानला 6 चेंडूत 9 धावांची गरज असताना आर्चरने एक चौकार आणि एक षटकार मारत राजस्थानला 19.2 षटकातच 176 धावांचा टप्पा गाठून दिला आणि या स्पर्धेतील चौथा विजय मिळवून दिला.
The Helicopter shot https://t.co/4wvBMNzgO1 via @ipl
— Shubham Pandey (@21shubhamPandey) April 26, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–१९ वर्षांपूर्वी वडीलांना तर आता मुलाला यष्टीरक्षक धोनीने केले बाद
–राजस्थानसाठी विजयी खेळी करणारा रियान पराग झाला असा बाद की कर्णधारही झाला चकीत, पहा व्हिडिओ
–विश्वचषकासाठी संधी न मिळालेला अजिंक्य रहाणे आता खेळणार या संघाकडून