१९वेळचा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रॉजर फेडररने चौथ्यांदा बीबीसीकडून दिला जाणारा परदेशी खेळाडूचा (Sports Personality of the Year ) पुरस्कार पटकावला आहे.
रॉजर फेडररचा बीबीसीकडून हा विक्रमी चौथा पुरस्कार आहे. ३६वर्षीय रॉजर फेडररला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर मते दिल्यामुळे अन्य ५ प्रतिस्पर्ध्यांवर मात करत त्याने हा पुरस्कार पटकावला आहे. २०१६साली हा खेळाडू टेनिसपासून पूर्णपणे दूर होता.
यावर्षी या दिग्गजाने विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले आहे. यापूर्वी मोहम्मद अली आणि उसेन बोल्ट यांनी हा पुरस्कार तीन वेळा जिंकला आहे.
“मला याचा अभिमान वाटतो आहे की इंग्लंडमध्ये राहणाऱ्या चाहत्यांनी मला मतदान करून हा पुरस्कार मिळवून दिला आहे. काही दिग्गजांवर मात करत हा पुरस्कार जिंकणे हे खरंच आनंदायी आहे. ” असे पुरस्कार विजेता फेडरर म्हणाला.
या पुरस्काराच्या शर्यतीत टॉम ब्रॅडी, कॅटी लेडिस्की, तात्यांना मसाफडदें, सल्ली पेअर्सन आणि मायकेल वन गैरवान हे खेळाडू होते.
यापूर्वी रॉजर फेडररने हा पुरस्कार २००४, २००६ आणि २००७या वर्षी हा पुरस्कार जिंकला होता. गेल्या १३वर्षात केवळ नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल हे दोनच खेळाडू प्रत्येकी एकवेळ हा पुरस्कार जिंकले आहेत.
It's a @BBCSPOTY record!@rogerfederer has won the BBC Overseas Sports Personality of the Year vote for a FOURTH time!
Full story👉 https://t.co/wVPBKVK3eq #SPOTY pic.twitter.com/rPcHS0KVD1
— BBC Sport (@BBCSport) December 15, 2017