विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये खेळला जात आहे. साउथम्प्टनच्या रोज बाउल स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी (१८ जून) पावसाचे आगमन झाले. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. दरम्यान भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा संघाला चांगली सुरुवात करून देऊन माघारी परतला. त्यानंतर पव्हेलियनमध्ये बसून त्याने चाहत्यांचे मन जिंकणारे कृत्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. बाद होण्यापूर्वी रोहित शर्माने शुबमन गिलसोबत मिळून ६२ धावांची भागीदारी केली होती. परंतु कायल जेमिसनने टाकलेल्या चेंडूवर त्याने रक्षात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटचा कडा घेत तिसऱ्या स्लीपवर असलेल्या टीम साउथीच्या हातात गेला आणि रोहित शर्मा झेलबाद झाला.
रोहितने या डावात ३४ धावा केल्या. बाद होऊन पवेलियनमध्ये परतल्यानंतर देखील तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. डावातील ५४ व्या षटकात तो ड्रेसिंग रूममध्ये बसून दुर्बिणच्या साहाय्याने अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीच्या फलंदाजीचा आनंद घेताना दिसून आला.
हा फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच या फोटोवर अनेकांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “असे मी तेव्हा करतो, जेव्हा मी माझ्या कॉलेजमध्ये शेवटच्या बेंचवर बसतो.”
तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “मी माझ्या खऱ्या मित्रांना सोशल मीडियावर अशाचप्रकारे शोधत असतो.”
तर आणखी एका युजरने प्रसिद्ध हिंदी गाण्याचे बोल ट्विट करत लिहिले आहे की, “मेरे सामने वाली खिडकी मे, एक चांद का तुकडा रहता है.” याबरोबरच अनेकांनी रोहित-विराटच्या मैत्रीचे गुणगान गायले आहेत. (Rohit sharma funny moments during WTC final match)
https://twitter.com/TheBTG27/status/1406258498816544771?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406258498816544771%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fwtc-final-2021-rohit-sharma-funny-moments-during-match-78282
दुसऱ्या दिवसाचा (१९ जून) खेळ सुरु असताना तब्बल तीनवेळा अंधुक प्रकाशाचा व्यत्यय आला. त्यामुळे अखेर ६४.४ षटकांवर या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवसाखेर भारताने ३ गडी बाद १४६ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली नाबाद ४४ धावांवर फलंदाजी करत आहे. तर अजिंक्य रहाणे नाबाद २९ धावांवर फलंदाजी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितविषयी बोलत असलेल्या समालोचकाला दिनेशने केले ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘मौज कर दी’
‘पाऊस आमचा जल्लोष काय थांबवणार’, म्हणत चाहत्यांनी गायले हिटमॅन सॉन्ग; एकदा ऐकाच
क्रिकेट रसिकांना घडले विराटच्या अप्रतिम कव्हर ड्राईव्हचे दर्शन अन् पाकिस्तानी कर्णधार झाला ट्रोल