भारत आणि बांगलादेश या संघात शनिवारी (दि. 4 डिसेंबर) एकदिवसीय सामना खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात भारताला एका विकेेटने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या पराभवाचे कारण स्पष्ट केले. त्याने मान्य केले की भारतीय फलंदाजीमध्ये अवघड खेळपट्टीवर फिरकीपटूंच्या विरुद्ध खेळताना सुधारणा करण्याची गरज आहे.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सामना संपल्यानंतर म्हणाला की, “खेळपट्टी जरा आव्हानात्मक होती, यावर चेंडू फिरकी घेत होता. तुम्ही कसे खेळावे हे समजलेे पाहिजे. यात कोणतीही कारणे देऊन चालणार नाही, आम्हाला अशा परिस्थितीची सवय आहे. अशी परिस्थितीत त्यांच्या फिरकीपटूंविरुद्ध कशाप्रकारे फलंदाजी केली पाहिजे यावर लक्ष दिले पाहिजे. आमचे खेळाडू अशा परिस्थितीत खेळत मोठे झाले आहेत. फकत दबाव हाताळता आला पाहिजे. ”
बांगलादेश संघाने आपला 9वा गडी 136 च्या धावसंख्येवर गमावला होता. मात्र, त्यांच्याा शेवटच्या जोडीने त्यांना लक्ष्यापर्यंत पोहचवण्यात मदत केली. रोहित म्हटला की, “धावसंख्या खूप मोठी नव्हती. जर आम्हाला 30-40 धावा जास्त करता आल्या असत्या तर याने खूप मोठा फरक पडला असता. केएल राहुल (KL Rahul) आणि वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar) यांच्या फलंदाजीच्या जोरावर आम्ही तिकडे पोहोचू शकत होतो, पण आम्ही मधल्या षटकांमध्ये आणि या परिस्थितीतून पुनरागमन करणे अवघड असते.” मात्र, रोहितने आपल्या गोलंदाजांची स्तुती केली,पण शेवटच्या 30 मिनीटात ते आपला प्रभाव नाही पाडू शकले. यापुढे रोहित म्हणाला की,”हा सामना खूप घासून झाला. आम्ही चांगले पुनरागमन करत होतो. आम्ही चांगली फलंदाजी नाही केली. आमच्या गोलंदाजांनी शेवटपर्यंत त्यांना दबावामध्ये ठेवले, पण त्यांनी शेेवट पर्यंत दबावात संयम टीकवूण ठेवला.”
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताची प्रथम फलंदाजी करताना सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) अवघ्या 7 धावा करत बाद झाला. केएल राहुलच्या 73 धावांच्या खेळीमुळे भारताला 186 धावांच आव्हान उभे करता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचीही चांगलीच दमछाक झाली. मात्र, शेवटी महेदी हसन याच्या संयमी खेळामुळे बांगलादेश संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला.(Rohit sharma has accepted mistakes were done by batting department)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवाचे खापर फलंदाजांच्या माधी! वाचा केएल राहुलविषयी काय बोलला कर्णधार रोहित शर्मा
FIFA WORLD CUP: गतविजेत्या फ्रान्सची उपांत्यपूर्व फेरीत धडक; एम्बाप्पेच्या धडाक्याने पोलंड घरी