वनडे विश्वचषक 2023चा 21वा सामना रविवारी (22 ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने खराब सुरुवातीनंतर 273 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी तुफानी सुरुवात दिली. अर्धशतकापासून वंचित राहिलेल्या रोहित याने मात्र या दरम्यान एक मोठा विक्रम विश्वचषकात केला.
विजयासाठी मिळालेल्या 274धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी आक्रमक धोरण स्विकारले. या जोडीने 11.1 षटकांत 71 धावांची भागीदारी केली. रोहितने 40 चेंडूंमध्ये 46 धावा केल्या. यामध्ये प्रत्येकी चार चौकार व चार षटकारांचा समावेश होता. तर, दुसरीकडे गिलने 31 चेंडूंमध्ये पाच चौकाराच्या मदतीने 26 धावा केल्या.
रोहितने या सामन्यात चार षटकार मारताना एका विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार होण्याचा मान मिळवला. त्याच्या नावे या विश्वचषकात आत्तापर्यंत 17 षटकार जमा झाले आहेत. यापूर्वी सौरव गांगुली याने कर्णधार असताना 2003 विश्वचषकात भारतासाठी 15 षटकार मारले होते. या यादीमध्ये सुद्धा रोहितच्या पुढे 18 षटकारांसह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंच, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलीयर्स 21 षटकार व इंग्लंडचा माजी कर्णधार ओएन मॉर्गन 22 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
अद्यापही साखळी फेरीतील चार सामने तसेच भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्यास आणखी सहा सामने खेळण्याची रोहितला मॉर्गन याचा विक्रम मोडण्याची संधी असेल.
(Rohit Sharma Hits Most Sixes For India In Single ODI World Cup Edition)
महत्वाच्या बातम्या –
पीसीबीचा नवीन करार जाहीर! माजी कर्णधारालाच केले डिमोट, बाबरला…
शमी शानदारच! कुंबळेचा मोठा पराक्रम उद्ध्वस्त करत रचला आणखी एक कीर्तीमान