दिल्ली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्या(13 मार्च) पाचवा आणि शेवटचा वनडे सामना फिरोज शहा कोटला स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला खास विक्रम करण्याची संधी आहे.
या सामन्यात जर रोहितने 46 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या तर तो वनडे कारकिर्दीत 8000 धावांचा टप्पा पार करेल. त्याचबरोबर तो वनडेमध्ये सर्वात जलद 8000 धावांचा टप्पा गाठण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सौरव गांगुलीची बरोबरी करेल.
गांगुलीने 200 वनडे डावात 8000 धावांचा टप्पा गाठला होता. रोहितने आत्तापर्यंत 205 वनडे सामन्यातील 199 डावात 47.34 च्या सरासरीने 7954 धावा केल्या आहेत.
वनडेमध्ये सर्वात जलद 8000 धावांचा टप्पा गाठण्याचा विश्वविक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 175 डावात 8000 वनडे धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स आहे. त्याने हा टप्पा 182 डावात पूर्ण केला होता.
आत्तापर्यंत वनडेमध्ये 8000 धावांचा टप्पा 8 भारतीय खेळाडूंनी पार केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विराट कोहली, एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग आणि विरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे.
वनडेमध्ये सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करणारे क्रिकेटपटू –
175 डाव – विराट कोहली
182 डाव – एबी डिविलियर्स
200 डाव – सौरव गांगुली
203 डाव – रॉस टेलर
210 डाव – सचिन तेंडुलकर
महत्त्वाच्या बातम्या –
–मुंबईकर अजिंक्य रहाणेने केले शेतकऱ्यांबद्दल भावनिक आवाहन, पहा व्हिडिओ
–आयपीएल सुरु होण्यापुर्वीच सनरायझर्स हैद्राबादला मोठा धक्का, हा दिग्गज खेळाडू जखमी
–आयपीएल २०१९: हा संघ ठरणार विजेता, या दिग्गज माजी खेळाडूने वर्तवला अंदाज