क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दशकातील सर्वोत्कृष्ट वनडे संघाची निवड केली आहे. या संघात 3 भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. यामध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni), कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) या खेळाडूंचा समावेश आहे.
धोनीला या संघाचा यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून निवडले आहे. त्याचबरोबर, रोहितला सलामीला फलंदाजी करण्याची जबाबदारी दिली आहे. तर, विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे.
या संघात पाकिस्तानच्या (Pakistan) एकाही खेळाडूला संधी मिळाली नाही. परंतु, अफगाणिस्तानचा उत्कृष्ट फिरकीपटू गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) आणि बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) या खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा दमदार फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villiers) आणि हाशिम आमलाचीही (Hashim Amla) या संघात निवड करण्यात आली आहे. तर, ऑस्ट्रेलियाकडून फक्त मिशेल स्टार्क (Mitchell Starc) या संघात जागा बनवू शकला आहे.
इंग्लंडचा जबरदस्त फलंदाज जोस बटलरचाही (Jos Buttler) या संघात समावेश आहे. गोलंदाजीमध्ये न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि श्रीलंकेचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगा (Lasith Malinga) या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
Only one Aussie makes our ODI Team of the Decade…https://t.co/nYpzA4pmBk
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2019
असा आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा या दशकातील सर्वात्तम वनडे संघ –
-विराट कोहली- वनडे सामने- 229,धावा- 11232, सरासरी- 61.04 शतके- 43, अर्धशतके- 52
–हाशिम अमला- वनडे सामने- 159, धावा- 7265, सरासरी- 49.76, शतके- 26, अर्धशतके- 33
–रोहित शर्मा– वनडे सामने- 180, धावा- 8249, सरासरी- 53.56, शतके- 28, अर्धशतके- 39
–एबी डिविलियर्स- वनडे सामने- 135, धावा- 6485, सरासरी- 64.20, शतके- 21, अर्धशतके- 33
-एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक)- वनडे सामने- 197, धावा- 5640, सरासरी- 50.35, शतके- 4, अर्धशतके- 39, झेल- 170, St: 72
–शाकिब अल हसन- वनडे सामने– 131, धावा- 4276, सरासरी- 38.87, शतके- 5, अर्धशतके- 35, विकेट- 177, सरासरी- 30.15,
–जॉस बटलर- वनडे सामने- 142, धावा- 3843, सरासरी- 40.88, शतके- 9, अर्धशतके- 20
–लसिथ मलिंगा- वनडे सामने- 163, विकेट – 248, सरासरी- 29.04,
–मिशेल स्टार्क- वनडे सामने- 85, विकेट – 172, सरासरी- 20.99.
–ट्रेंट बोल्ट- वनडे सामने- 89, विकेट- 164, सरासरी- 25.06
–राशिद खान- सामने- 71, विकेट- 133, सरासरी- 18.54,
बुमराहचे झाले कमबॅक; ऑस्ट्रेलिया, श्रीलंका विरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
वाचा👉https://t.co/ISxcTSVj6O👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 24, 2019
तिसऱ्या वनडेनंतर रविंद्र जडेजाने केले मोठे भाष्य, म्हणाला…
वाचा- 👉https://t.co/dkOeSQsA3e👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019