टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. बार्बाडोसमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली. संपूर्ण स्पर्धेत धावांसाठी चाचपडणारा विराट कोहली आज चांगल्याच टचमध्ये होता. त्यानं मार्को यानसनला पहिल्याच षटकांत 3 चौकार हाणले. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमनं एक चाल खेळली. त्यानं फिरकीपटू केशव महाराजला दुसऱ्या षटकात गोलंदाजीला आणलं. समोर होता रोहित शर्मा.
रोहित शर्मानं या संपूर्ण विश्वचषकात चांगली फलंदाजी केली आहे. तो भारताकडून सर्वाधिक धावा करणार फलंदाज आहे. आजही त्यानं चांगली सुरुवात केली. रोहितनं षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवर केशव महाराजला 2 चौकार मारले. त्यामुळे आजही रोहित मोठी खेळी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला. क्लासेननं त्याचा शानदार झेल घेतला. रोहितनं 5 चेंडूत 9 धावा केल्या.
रोहित शर्मानं या टी20 विश्वचषकातील 8 सामन्यांत 257 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 36.71 आणि स्ट्राईक रेट 156.71 एवढा राहिला. तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रोहितनं या विश्वचषकात 24 चौकार आणि 15 षटकार हाणले.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
दक्षिण आफ्रिका- क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी
महत्त्वाच्या बातम्या –
भारत बनणार विश्वविजेता! इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केली भविष्यवाणी
फायनल जिंकताच रोहित शर्मा रचेल इतिहास, अशी कामगिरी करणारा बनेल जगातील पहिला कर्णधार
रोहित-रबाडापासून, विराट-यानसेनपर्यंत, फायनलमध्ये या खेळाडूंमध्ये पहायला मिळेल जंगी लढत