---Advertisement---

चर्चा तर होणारच! गेंड्याच्या संवर्धानानंतर आता रोहित शर्मा केकेआरविरुद्ध ‘हा’ संदेश देणारी बुटं घालत उतरला मैदानात

---Advertisement---

मंगळवारी (१३ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) असा सामना रंगला. या सामन्यात मुंबईने १० धावांनी विजय मिळवला आहे. या हंगामातील हा त्यांचा पहिलाच विजय आहे. तरी, या सामन्यादरम्यान पुन्हा एकदा मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या शूजची चर्चा झाली.

रोहितने पुन्हा दिला सामाजिक संदेश
केकेआर विरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर रोहित क्विंटन डी कॉकसोबत सलामीला आला. रोहितने यावेळी घातलेल्या शूजवर एक अनोखा संदेश लिहीला होता. लोकांनी समुद्रामध्ये प्लास्टिक टाकून समुद्र प्रदूषित करू नये म्हणून, रोहितने आपल्या शूजवर ‘प्लास्टिक फ्री ओशन’ अशी अक्षरे लिहीली होती. रोहितच्या शूजचे हे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तसेच लोक या उपक्रमासाठी त्याचे अभिनंदन देखील करत आहेत.

https://twitter.com/Cheemad69/status/1381990225719648259

पहिल्या सामन्यात ही रोहितने दिला होता संदेश
रोहितने आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यातही एक संदेश दिलेला. जगभरात गेंड्यांची संख्या कमी होत असताना त्याने गेंड्यांचे संवर्धन करणे हा संदेश देण्यासाठी आपल्या शूजवर ‘सेव्ह द रायनोज’ अशी अक्षरे लिहिलेली. त्याने याबाबत ट्विटदेखील केले होते. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने या गोष्टीसाठी त्याचे अभिनंदन केलेले. पीटरसन गेंड्याचे संवर्धन करण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे.

रोहितची संथ खेळी
केकेआर विरुद्धच्या सामन्यात या सामन्यात रोहितने ३२ चेंडूत ३ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. रोहित पहिल्या सामन्यातही केवळ १९ धावा काढून बाद झाला होता. उर्वरित सामन्यांमध्ये संघ व्यवस्थापनाला रोहितकडून कॅप्टन्स इनिंगची अपेक्षा असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

सनरायझर्ससाठी खुशखबर! भुवी आणि विलियम्सनला मिळाले ‘हे’ मानाचे पुरस्कार

Video: मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी ब्रेंडन मॅक्यूलमने शाकिब अल हसनला दिली खास कॅप, ‘हे’ आहे कारण

दुखापतींपासून वाचण्यासाठी ‘हिटमॅन’ करतोय ‘हे’ काम, स्वत:च केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---